अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी मागितली 50 हजारांची लाच, बालविकास प्रकल्प अधिका-यावर गुन्हा दाखल
अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी मागितली 50 हजारांची लाच, बालविकास प्रकल्प अधिका-यावर गुन्हा दाखल
वैजापूर, दि.4(डि-24 न्यूज) तालुक्यातील शहाजतपूर येथे सन 2015 पासून अंगणवाडी मदतनीस म्हणून आहे. अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती मिळावी यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. 20 हजार रुपये तडजोडी अंती स्विकारण्याचे मान्य केले. दोन साक्षिदार यांना दहा हजार प्रमाणे मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंगणवाडी मदतनीसचे पती यांनी तक्रार केली. पथकाने आज सापळा रचून बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना कार्यालय पंचायत समिती वैजापूर( वर्ग-2), अनंत सूर्यभान बुट्टे, वय 45, व्यवसाय शिपाई, यांना लाचेची रक्कम स्विकारताना पकडले. वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी आहे, तक्रारदार यांच्या पत्नी अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीस दिनांक 17/3/2023 रोजी अंगणवाडी सेविका पदावर प्रमोशन देण्यात आले होते परंतु उच्च न्यायालय यांनी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका पदाच्या प्रमोशनवर स्थगिती दिल्यामुळे तक्रारदार यांच्या पत्नीचे अंगणवाडी सेविका पदावर प्रमोशन झाले नव्हते. त्यानंतर 3/9/2024 रोजी अंगणवाडी सेविका या पदोन्नतीचा स्टे न्यायालयाकडून उठवण्यात आल्याने व नियमितपणे अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या पत्नी या दिनांक 30/9/2024 रोजी प्रमोशन बाबत चर्चा करण्यासाठी पंचायत समिती वैजापूर येथे अनिल चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना भेटले. त्यांनी पदोन्नती देण्यासाठी 50 हजारांची लाचेची मागणी केली. हे पैसे तुम्ही दिले नाही तर वेळेवर पदोन्नती मिळणार नाही. शिपायाने सांगितले पैसे देऊन टाका बाकी काय असेल मी मॅनेज करतो. कार्यालयात साक्षीदार विशाल साळुंखे, ज्ञानेश्वर मुलमुले यांच्यासोबत भेटले. प्रकल्प अधिकारी यांना 20 हजार, दोन्ही साक्षिदारांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख शिपायाने घेत प्रकल्प अधिकारी यांच्या टेबलच्या ड्राॅमध्ये ठेवताना रंगेहाथ पकडले.
What's Your Reaction?