महाविकास आघाडीला इम्तियाज जलील यांचा पुन्हा अल्टिमेटम

 0
महाविकास आघाडीला इम्तियाज जलील यांचा पुन्हा अल्टिमेटम

महाविकास आघाडीला इम्तियाज जलील यांचा पुन्हा अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) महाविकास आघाडीने महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएमला विधानसभा निवडणुकीत सोबत घ्यावे असा अल्टिमेटम पुन्हा आज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय सिरसाट यांनी केलेल्या टिकेला सुध्दा त्यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. 

त्यांनी पुढे सांगितले भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही निवडणूकीच्या रिंगणात पुर्ण तयारीने उतरलो आहोत. ज्या विधानसभा मतदारसंघात आमची ताकत आहे तेथे आम्हीला जागा सोडावी आम्ही आघाडी धर्म पाळण्यासाठी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांना 10 सप्टेंबर रोजी पक्षाच्या वतीने पत्र दिले आहे. आम्ही युतीसाठी चर्चा करण्यास तयार आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने काही उत्तर दिले नाही. आम्ही निवडणुकीत उमेदवार देणार आहोत किती जागेवर देणार अजून निश्चित नाही. नंतर एकला चलोची भुमिका आम्ही घेतली त्यांच्या उमेदवारांसमोर आमचा उमेदवार उभा केला तर आरोप करायचे नाही असा इशारा त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow