50 लाख रुपये रोख रक्कम जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल
बेनामी 50 लाख रुपये रोख रक्कम जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) दोन जणांकडून बेनामी 50 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की सिल्लेखाना भागात दोन अनोळखी इसम त्यांचे मोटार सायकलवर येणार असून त्यांचेकडे जास्त प्रमाणात बेनामी रक्कम आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त परिमंडळ -1 नितिन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात सापळा लावून नेस्को सर्जीकल समोर रोडवर थांबलो असता अर्जून भास्कर मुंडलीक, वय 50, राहणार तापडिया नगर, औरंगाबाद, सिध्देश अर्जून मुंडलिक, वय 23, यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पाठीवर असलेल्या दोन बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असती सदर बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळून आल्याने त्याबाबत सदर इसमांना विचारपूस करता त्यांनी काहीएक उपयुक्त माहिती दिली नाही. त्यावरून सदरची रक्कम ही बेनामी असल्याची खात्री झाल्याने नमूद इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 50 लाख रोख रक्कम, 60 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दोन मोटारसायकल असा एकूण 52 लाख 20 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, पोउपनि अर्जुन कदम , पोह इरफान खान, जफर पठाण, निवृत्ती गोरे, सतीश जाधव, अर्जून जिवडे, दत्तात्रय दुभाळकर यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोउपनि देविदास शेवाळे करत आहे.
What's Your Reaction?