दामिनी पथकाची कामगिरी, विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्याला शिकवला धडा
दामिनी पथकाची कामगिरी, विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्याला शिकवला धडा
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) एसबी काॅलनीत भाड्याच्या खोलीत ग्रामीण भागातील विद्यार्थीनी युपीएससी व एमपीएससीचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनींनी चक्क रस्त्यावर आले व होणा-या त्रासाला कंटाळून दामिनी पथकाला संपर्क केला. वस्तीगृहाचा मालक मुलींना काही महिन्यांपासून घाणेरडे हावभाव करत घाणेरडे नजरेने बघत असल्याने त्या मुली संतप्त होऊन दामिनी पथकाची मदत मागितली. तात्काळ पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दोन दामिनी पथक व दोन कर्मचारी एसबी काॅलनीत पाठवली असता तेथे 15 मुली उभ्या होते. त्यांनी आपबिती सांगितली व न्याय मिळवून देण्याची विनंती केली. भीती बाळगू नका क्रांतीचौकात लेखी तक्रार देण्यास सांगितले. बदनामीच्या धाकाने मुली पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देत नव्हते. मुलींनी पिएसआय सोनवणे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली. यानंतर काही त्रास झाला तर 112 क्रमांकावर संपर्क साधावा. त्या इसमाविरुध्द कायदेशीर कारवाई करुन धडा शिकवला.
यावेळी मुलींनी पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे, दामिनी पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाॅ निर्मला निंभोरे, रुपा साखला, पोलिस नाईक संगिता परळकर, सोनाली निकम, सुरेखा कुकलारे, मनिषा तमखाने यांनी सदरील कार्यवाहीत सहकार्य केले. मुलींनी दामिनी पथकाचे आभार मानले.
What's Your Reaction?