दौलताबाद किल्ला परिसरात आग, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...!

देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात...आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...
दौलताबाद, दि.8(डि-24 न्यूज) दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सकाळपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. एकीकडे आग विझवली तर दुसरीकडे भडका उडत आहे. आग गावाकडे पसरु नये यासाठी सरकारी व खाजगी दहा ते बारा पाण्याचे बंबाने आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवा सुरु असल्याने आगीचे लोन आभाळाकडे दिसून येत आहे. भर उन्हाच्या कडाक्यात देवगिरी किल्ल्याला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ल्याला चारही बाजुंनी आगीने घेरले आहे. आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना आगीचे लोट पसरलेले आहे. तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांत धूर पसरला असल्याचे समजते आहे.
यादरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान मोठे जीवाणू प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदि प्राणी सौरावैरा पळू लागली आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. आग विझवण्याचे कोणतेही साधन नसताना त्या ठिकाणी असलेल्या हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची पोलीस चौकशी करत आहेत. दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी, ग्रामपंचायत व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहे
.
What's Your Reaction?






