शहरात निघालेल्या तिरंगा यात्रेला हजारोंचा जनसागर लोटला

 0
शहरात निघालेल्या तिरंगा यात्रेला हजारोंचा जनसागर लोटला

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि पेपरफुटीविरोधात संभाजीनगरात तिरंगा मार्च

हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच देशभरातील पेपरफुटीच्या वाढत्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवार, 26 जुलै रोजी तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी काढण्यात आलेल्या या मार्चला शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

क्रांती चौक ते पैठण गेट या दरम्यान काढण्यात आलेल्या तिरंगा मार्चमध्ये हजारो नागरिक हातात राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार हाय हाय...मोदी सरकार हाय हाय.. विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या तिरंगा मार्चमध्ये सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता केवळ राष्ट्रध्वज हातात घेतला होता. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी भावना भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावेळी मांडली. 

 याप्रसंगी शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, नगरसेवक रशीद खान मामू, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow