मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा - डॉ.कल्याण काळे

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची डॉ.कल्याण काळे यांची मागणी
मुंबई, दि. 28(डि-24 न्यूज) मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी निवेदन दिले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 104 मराठा बांधवांसमवेत मराठा समाजाला आरक्षण व तद्नुंषगिक मागण्यांची पुर्तता होण्यासाठी मौजे अंतरवाली सराटी, ता.अंबड, जि.जालना येथे शनिवार, दिनांक 25 जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र असुन, असंतोष निर्माण झालेला आहे.
मनोज जरांगे पाटील व 104 मराठा बांधव यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची दखल घेऊन सदरहू उपोषण तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यांत यावी अशी विनंती करणारे निवेदन आज मुंबई येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
या वेळी अजित दादांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू असा शब्द दिला.
What's Your Reaction?






