शिवसेनेच्या चक्काजाममुळे थांबली एसटी, अंबादास दानवे यांच्या सह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...!

शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने एसटी अर्धा तास थांबली, अंबादास दानवे सहीत कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...
बस भाडेवाढीविरोधात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर चक्काजाम आंदोलन...
भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज): राज्य सरकारने राज्यात 15 टक्के बस दर वाढीचा निर्णय घेतला आहे. जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर अतिरिक्त भुर्दंड पडत असल्याने शिवसेना उद्धव - बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक होत शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज संभाजीनगरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर तीव्र चक्काजाम आंदोलन केले. भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्र्याचा धिक्कार असो..परिवहन मंत्री हाय.. हाय.. अशा जोरदार घोषणा देत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत परिसर दणाणून सोडला.
राज्य शासनाने एसटीची 15 टक्के केलेली भाडेवाढ अन्यायकारी करणारी आहे. दोन महिन्यापूर्वी एसटी महामंडळ फायद्यात असल्याचे महामंडळाचे अध्यक्षांनी सांगितले होते. असे असताना एसटीची भाडेवाढ होणे म्हणजे सर्वसामान्य माणसाची राज्य सरकार लूट करत आहे. दुर्दैव म्हणजे राज्याच्या परिवहन मंत्र्यालाच सदरील भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती नसल्याची, प्रतिक्रिया दानवे यांनी यावेळी व्यक्त केली..
परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर सुरुवातीला चमकोगिरी केली. एसटीने प्रवास केला मात्र त्यांना प्रवाशांची व्यथा कळलीच नाही. एसटी ही ग्रामीण तसेच निमशहरी भागातील प्रवाशांची मुख्य प्रवासाचे साधन आहे. सदरील झालेली 15 टक्के भाडेवाढ रद्द झाली पाहिजे,अशी भूमिका शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी केली..
मराठवाड्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील बसस्थानकावर सदरील चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आज फक्त बसस्थानकाच्या गेटवर बस काही काळ थांबवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. आगामी काळात राज्यभर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्का जाम करून या शासनाला भाडेवाढ रद्द करण्यास भाग पाडू असे थेट, आव्हान दानवे यांनी सरकारला दिले.
राज्य सरकारने एकाच फटक्यात 15 टक्के भाववाढ करणे नियमाला धरून नाही.थोड्याफार प्रमाणात भाडे वाढ सामान्य नागरीक समजू शकतो मात्र महामंडळ फायद्यात असताना अशा प्रकारे भाडेवाढ करणे शासनाचे अन्यायकारी धोरण असल्याची, टीका अंबादास दानवे यांनी केली.
श्रीमंत नव्हे तर सर्वसामान्य माणूस या एसटीने प्रवास करतो.राज्य सरकार अनेक अमिषे आणि वायफळ खर्च करतं असताना अशी भाडेवाढ करणे योग्य आहे का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
राज्याचे परिवहन मंत्री यांना एसटी भाडेवाढ झाली असल्याची माहिती नसल्याची खंत अंबादास दानवेंनी व्यक्त केली. जनतेची भूमिका शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मांडत असल्याची, भावना दानवे यांनी प्रकट केली..
याप्रसंगी राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, लक्ष्मीनारायण बखरिया, अशोक शिंदे, किशोर कच्छवाह, अरविंद धीवर, राजू इंगळे, चंद्रकांत गवई, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, मा.नगरसेवक विनोद सोनवणे, कल्याण चक्रनारायण, कान्हुलाल चक्रनारायण, कमलाकर आण्णा जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, तालुकाप्रमुख आनंद भालेकर, उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव, उपशहरप्रमुख प्रितेश जैस्वाल, सुरेश गायके, वसंत शर्मा, नितीन पवार, कृष्णा मेटे, सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, शेख रब्बानी, संजय हरणे, जयसिंग होलिये, विजय सूर्यवंशी, किरण सालपे, नाना जगताप, लक्ष्मण पिवळ, सचिन वाघ, सुरेश पवार,दिनेशराजे भोसले, संतोष बारसे, प्रल्हाद घुगे, शिवाजी बचाटे, नाना पाटील, सागर निकम, ऋषिकेश हिवाळे, निखिल बारवाल, नितीन झरे, संजीवन सरोदे, दत्ता लोहकरे, सचिन वाहुळ, गणेश कुलकर्णी, उमेश साळुंखे, कुणाल पाठक, लक्ष्मण मुळे, विनोद दाभाडे, दत्तात्रय वरपे, निरमल कनघर, सुभाष आडे, देविदास पवार, शैलेशसिंग रावत, श्रीराम धांडे, साहेबराव सपकाळ, सोमीनाथ गुंजाळे, बाबुलाल बिजारणे, संदीप कुमावत, भाऊसाहेब राहते, पंडित बोरसे, श्रावण उधागे, विनायक देशमुख, सुरेश व्यवहारे, निलेश घुले, मंगेश वाघमारे, सलीम खामगावकर, युवासेना सहसचिव ॲड. धर्मराज दानवे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, लता पगारे, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक सुनंदा खरात, अरुणा भाटी, माजी महापौर शिलाताई गुंजाळ, मा.नगरसेविका सीमाताई चक्रनारायण, रजनी जोशी, शहर संघटक वैशाली आरट, भागू आक्का शिरसाठ, सुनिता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, विधानसभा समन्वयक रेणूका जोशी, रेणुका शहा, उपशहर संघटक सारिका शर्मा, विजया पवार,संध्या कोल्हे, बबिता रेनावले,रोहिणी काळे, दिपाली पाटील, छाया देवराज, संगीता नरवडे, कल्पना मुळे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक व शिवसै
निक उपस्थित होते.
What's Your Reaction?






