विना परवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, डेअरी चालकांवर कार्यवाई
 
                                विना परवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मिती; डेअरीचालकावर कारवाई
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7 (डि-24 न्यूज) शहरातील चेलीपुरा भागातील अजिंठा दुध डेअरी येथे विना परवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मिती होत असल्याचे आढळून आल्याने डेअरी चालकावर कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ वातावरणात होत असलेल्या निर्मितीसंदर्भात दुग्धजन्य पदार्थांचे नमुनेही घेण्यात आले आहेत.
अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.व्ही.पाटील, अजित मैत्रे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ- मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रोडे, श्रीमती जाधवर आदींच्या पथकाने मंगळवारी (दि.६) रात्री ही कारवाई केली. या मोहिमेत सहा कॅन मध्ये 149 किलो दही, 19 किलो पनीर, 49 किलो एसएमपी पावडर जप्त करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन शितकरण केंद्र, खाजगी सहकारी दुध उत्पादक संस्था यांनी उच्च प्रतिचे भेसळ विरहीत दुध स्विकृती व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व विक्री करावी. त्यासाठी लागणारे वजन काटे प्रमाणित करुन घ्यावे. नागरिकांना निर्भेळ व स्वच्छ दुध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करुन द्यावे,असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            