एमआयएमने पाठीत खंजीर खुपसला- एड बाळासाहेब आंबेडकर

 0
एमआयएमने पाठीत खंजीर खुपसला- एड बाळासाहेब आंबेडकर

एमआयएमने पाठीत खंजीर खुपसला, एड बाळासाहेब आंबेडकर यांचा घणाघात...!

घराणेशाहीकडे सत्ता असल्याने मराठवाडा मागासलेला, मुस्लिम समाजाने काँग्रेस सोबत जाऊ नये, त्यांनी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही मग कसले सेक्युलर... औरंगाबाद, जालना, बीडच्या उमेदवारांना निवडून देण्याचे केले आवाहन...

वंचितने मोहंमद पैगंबर बील आणले, जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजावर अन्याय झाला उभे राहिलो मानवतेच्या भावनेतून आता आमच्यासोबत उभे राहण्याचे आवाहन मुस्लिम समाजाला केले....

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला. युती धर्म पाळता येत नसेल तर युती कशाला करता असा हल्लाबोल आज आमखास मैदानावर झालेल्या जाहीर सभेत वंचितचे सर्वेसर्वा एड बाळासाहेब आंबेडकर यांनी ओवेसींवर केला आहे.

वंचितचे उमेदवार अफसरखान यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वंचितचे नेते अमित भुईगळ, जावेद कुरैशी, जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पूर्वचे शहराध्यक्ष मतीन पटेल, मध्यचे अध्यक्ष जलिस अहेमद, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मिलिंद बर्डे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले एमआयएमने लक्षात ठेवावे गेल्या वेळी ओबीसींमुळे लोकसभेत विजयी झाला. मुस्लिम समाजातील कार्यकर्ता वाईट असला तरी शिकवत नाही वाईट बोलत नाही. सेक्युलर हिंदूंनी सुध्दा जात पात न बघता कर्तुत्व बघून मतदान केले त्यांच्या मताला किंमत न देता विधानसभा निवडणुकीत युती तोडून एमआयएमने विश्वासघात केला असल्याचा घणाघात आंबेडकर यांनी केला.

येथून अफसरखान यांना उमेदवारी दिल्याने मुस्लिम उमेदवार दिला असल्याची अफवा उडवली जात आहे. हे बरोबर नाही त्यांनी यावेळी एमआयएमवर हल्लाबोल केला. वंचितने पाच ते सहा उमेदवार मुस्लिम दिले. तेली, माळी, कोळी, धनगर, मराठा कुणबी सर्व जाती धर्मातील नेत्यांना उमेदवारी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने प्रस्थापितांना तिकीटे दिली. घराणेशाही वाढतच आहे. घराणेशाहीची सत्ता असल्याने मागासलेल्या मराठवाड्याचा विकास थांबला आहे. जोपर्यंत यांच्या हातातून सत्ता जात नाही तोपर्यंत विकास होणार नाही. यासाठी वंचित सोबत यावे लागेल काँग्रेसने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यातील एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही तरीही मौलवींच्या म्हणण्यानुसार मुस्लिम समाज काँग्रेस सोबत जाऊ लागले आहे. म्हणूनच भाजपाचे राजकारण यशस्वी होत आहे यासाठी मुस्लिम मौलवी जवाबदार आहे दोनदा मोदी यांच्यामुळे सत्तेवर आले. मी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून वचन मागितले होते की निवडून आल्यानंतर पाच वर्षे कोठे जाणार नाही. मला आश्वासन मिळाले नाही. मोदी आता बोलत फिरत आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्यावर फार उपकार आहेत उध्दव यांना मदत करु यावरुन असे लक्षात येते निवडणुकीनंतर काय होईल सांगता येत नाही म्हणून मोदींना रोखण्यासाठी वंचितचा एजंडा आहे म्हणून वंचितला साथ द्या अशी साद आंबेडकर यांनी मुस्लिम व अन्य समाजाला घातली. मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही साथ दिली तुम्हीही साथ द्या येणारा काळ कठीण येणार आहे. मोदींची पुन्हा सत्ता आल्यानंतर काय होईल अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे पती यांनी सांगितले आहे ते लक्षात ठेऊन मतदान करावे. असे भावनिक आवाहन त्यांनी करत काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी आपल्या भाषणात म्हणतात काँग्रेस सत्तेवर आल्यास देशाचे विभाजन करतील त्यांचे उत्तर काँग्रेसचे नेते देत नाही. चंद्रपुरचे उमेदवार धानोरकर म्हणाल्या खासदार, आमदार, नगरपालिका, जिल्हा परिषदांवर कुणबींची सत्ता हवी यानंतर मतदारांमध्ये गैरसमज झाला त्यामुळे काँग्रेसचा मतदार बाजूला झाल्याने तिसऱ्या नंबरवर राहणार आहे म्हणून लक्षात ठेवावे निवडणूक एका समाजाच्या मतांवर निवडून येत नाही त्यासाठी सर्व समावेशक वातावरण निर्माण झाले पाहिजे. विजयी होण्यासाठी सर्व जाती धर्मातील मत लागतील म्हणून अफसरखान हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून द्या. त्यांच्या सोबत फक्त मुस्लिम मतदार नाही तर सर्व जाती धर्मातील मतदार उभे राहावे असे आवाहन त्यांनी जाहीर सभेत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow