सतीश चव्हाण लोकसभेसाठी संभावित उमेदवार...? अजित पवारांनी ठोकला दावा...?
सतीश चव्हाण लोकसभेसाठी संभावित उमेदवार...? अजित पवारांनी ठोकला दावा
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) जसजसे लोकसभा निवडणुक जवळ येत आहे प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. शिंदे गट, भाजपा व उध्दव ठाकरे गटानंतर आता अजित पवार गटाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण हे संभावित उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे.
महायुतीमध्ये घटक पक्षांकडे 9 जागेवर अजित पवार आग्रही आहेत. महायुतीमध्ये पवार आपली पाॅवर दाखवतील का हा येणारा काळ ठरवेल. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले आहे. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक लढण्याची तयारी केली होती पण काँग्रेसने जागा न सोडल्याने ते शांत झाले होते.
अजित पवार यांच्या गटाकडून औरंगाबाद, बारामती, सातारा, रायगड, शिरुर या चार जागा राष्ट्रवादी कडे आहे. या जागा सोडून उस्मानाबाद, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा, गोंदिया या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार देण्याची मागणी घटक पक्षांकडे केली आहे.
बारामती येथून सुनेत्रा पवार, औरंगाबाद सतीश चव्हाण, सातारा रामराजे निंबाळकर, रायगड सुनिल तटकरे, शिरुर शिवाजीराव आढळराव पाटील, दक्षिण मुंबई काँग्रेसमधील बडा चेहरा, परभणी राजेश विटेकर, भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल, उस्मानाबाद राणा जगजितसिंग हे संभावित उमेदवार असल्याचे कळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवार यांनी दिल्लीत भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याचे कळत आहे.
सतीश चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. जागावाटपात भाजपा शिंदे गट व अजित पवार गट यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादच्या जागेवर अगोदरच शिंदे गट व भाजपाने दावा केला आहे आता यामध्ये राष्ट्रवादीची भर पडली आहे. या जागेवर इच्छूकांची संख्या वाढत आहे. भाजपाच्या वतीने डॉ.भागवत कराड, शिंदे गट संदीपान भुमरे, उध्दव गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, मनसेकडून प्रकाश महाजन, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, वंचित या पक्षांकडून अनेक नेते इच्छुक आहेत.
What's Your Reaction?