कमिशनवाढ व ई-केवायसी करण्याची निरंतर सेवा सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी केले आंदोलन
कमिशनवाढ व केवायसीची सवलत नेहमीसाठी सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांचे आंदोलन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) ज्या रेशनकार्ड धारकांने कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी केली नाही तर त्यांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळणार हा अजब निर्णय गरीब जनतेवर अन्याय करणारा आहे ज्या पद्धतीने जन्म मृत्यू नोंदणी नेहमीसाठी सुरू असते त्याप्रमाणे रेशन कार्ड धारकांना शासनाने सवलत व सेवा निरंतर सुरू ठेवण्यात यावी. केवायसीची तारीख वाढवून चालणार नाही. स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनवाढ व विविध प्रलंबित मागणीसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व परवानाधारक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रलंबित मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली निवेदन दिले तरीही मागणी शासन स्तरावर सोडवण्यात आली नाही. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यासोबत मार्जिनमध्ये 50 रुपये इतकी वाढ करण्यासाठी चर्चा झाली. आतापर्यंत कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. म्हणून राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले. कमिशनमध्ये किमान शंभर रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात यावी. शासकीय गोदामातून धान्य कमी मिळत आहे व खराब येत आहे यामध्ये सुधारणा करावी. वितरण तुट म्हणून प्रती क्विंटल दोन किलो मंजूर करण्यात यावी. ई-केवायसी निरंतर प्रक्रीया असावी त्यामध्ये बंधने लादू नयेत. ई- केवायसी व मोबाईल सीडींग करण्यासाठी प्रती सदस्य 50 रुपये इतके शुल्क संबंधित लाभार्थ्यांकडून वसूल करण्याची परवानगी द्यावी. सर्व प्रकारच्या प्रलंबित मार्जिंन रकमेची अदायगी तातडीने करावी.
अशा एकूण 14 मागणीचे निवेदन आज सादर करण्यात आले.
यावेळी शेकडो रेशन दुकानदार उपस्थित होते.
यामध्ये जिल्हाध्यक्ष मधुकर चव्हाण, जे.ई.जाधव, श्रीमंत बोंगाने, नंदु तुपे, सय्यद लईकोद्दीन व सर्व तालूका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?