उद्या आमखास मैदानावर सोशिओरेना कार्यक्रमातून जनजागृती, विद्यार्थ्यांचा स्त्तूत्य उपक्रम बघा...
उद्या आमखास मैदानावर सोशिओरेना कार्यक्रमातून जनजागृती, विद्यार्थ्यांचा स्त्तूत्य उपक्रम
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(प्रतिनिधी) - समाजात वाईट सवयी, रुढी परंपरा पसरत असल्याने युवकांच्या जीवनावर याचा परिणाम होत असल्याने उज्वल भविष्य घडवण्याच्या वयात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ड्रग्सच्या आहारी जात असल्याने गुन्हेगारीकडे वळत आहेत आणि मोबाईल अतिवापरामुळे मेंदूवर परिणाम होत आहे. महीला सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत होत आहे. हुंडाबळीमुळे तरुणी आत्महत्या सारखे पाऊल उचलत आहे. म्हणून समाजातून वाईट सवयी, समाजाला घातक रुढी परंपरा संपावी या उद्देशाने उद्या सायंकाळी 5.30 वाजता आमखास मैदानावर SOCIORENA 2.0 हा मुक समाजजागृती कार्यक्रम नर्सरी ते हायस्कूलचे विद्यार्थी सादर करणार आहे.
अशी माहिती पत्रकार परिषदेत स्काॅलर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी दिली.
यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून 35 गंभीर विषयावर पोस्टर हातात घेऊन जनजागृती केली जाणार आहे.
पाण्याची बचत व टंचाई, अन्नाची नासाडी, बालमजुरी, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, हुंडा प्रथा, तंत्रज्ञानाचा गैरवापर, सामाजिक विषमता तसेच नैतिक आव्हाने यांसारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणार आहे. सामाजिक जवाबदारीवर आधारित मुल्यनिष्ठ उपाययोजना मांडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे व माध्यमांसमोर या विद्यार्थ्यांनी चोख माहिती देत प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली.
पत्रकार परिषदेत हुजैफा मारीया, तायबा तहरीम, इफरा इम्तियाज, अनाबिया, लायबा फारुकी , बुशरा नदीम, अनस सिद्दीकी, अरहाम, अरीब इनामदार, शेख आयेशा, मुस्कान शेख, मुजीबार अंबेकर यांची उपस्थिती हो
ती.
What's Your Reaction?