सावधान... उद्यापासून 30 तास शहराचा पाणीपुरवठा खंडित राहणार...!
सावधान... उद्यापासून 30 तास शहराचा पाणीपुरवठा खंडित राहणार...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) गळतीच्या कामाचे स्वरूप मोठे असल्याने 1400 मीमी व्यासाची मुख्य जलवाहिनीवर साधारणतः 30 तासांचा खंडणकाळ उद्या दिनांक 20/3/2025 रोजी सकाळी 10 ते पुढील 30 तासांपर्यंत घेण्यात येणार असल्याने शहरात नळाला 30 तास पाणीपुरवठा होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
12 मार्च रोजी रेल्वेस्टेशन नजीक जालाननगर उड्डाणपुलाखाली महापालिकेच्या 1400mm व्यासाच्या पोलादी जलवाहिनीवर गळतीचे पाणी वाहताना निदर्शनास आले आहे. मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेची 1100mm व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम मजीप्रा मार्फत नियुक्त यंत्रणा जी.व्हि.पी.आर.या कंत्राटदारामार्फत सुरू होते. मागील पाच ते सहा दिवसांपासून सदर गळती दिवसेंदिवस वाढत असून अचानक रात्री बेरात्री हि जलवाहिनी फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलवाहिनी अचानक फुटल्यास आजुबाजुच्या परिसरात पाणी जावून हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गळती झालेल्या ठिकाणी जलवाहिनीवर मोठा काँक्रेट ब्लॉक असून त्याखाली वाय स्वरूपात अस्तित्वातील 1400mm व्यासाची जलवाहिनीची जोडणी करण्यात आली आहे.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास पुढील अतिरिक्त सहा तासांचा कालावधी लागेल. सदर गळती दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा उक्त कालावधीत बंद राहणार आहे. तथापि एक्स्प्रेस जलवाहिनी व त्याद्वारे सिडको हडको भागास होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहील. या अकस्मिकरित्या जलवाहिनीवर झालेल्या मोठ्या गळतीमुळे करावयाच्या दुरुस्तीमुळे शहर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांना होणा-या त्रासाबद्दल महानगरपालिका दिलगिरी व्यक्त करते यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?