सर्व्हिस रोडवरील मालमत्ताधारकांना प्रशासक जी श्रीकांत यांची सूचना...

 0
सर्व्हिस रोडवरील मालमत्ताधारकांना प्रशासक जी श्रीकांत यांची सूचना...

सर्व्हिस रोडवरील मालमत्ताधारकांना प्रशासक जी श्रीकांत यांची सूचना...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास, पडेगाव-मिटमिटा रोडवरील सर्व्हिस रोडवरील बाधित मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तेवरील अनधिकृत बांधकामे स्वतःहुन काढण्यासाठी दि.15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

हि मुदत केवळ रहिवासी मालमत्ताधारकांसाठी असून यामध्ये व्यवसायिक मालमत्ता किंवा अन्य कोणत्याही मालमत्तांचा समावेश नाही. 

ज्या मालमत्ता धारकांचे 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत बांधकामे आहेत आणि ज्यांना कायदेशीर कार्यवाईचा धोका आहे अशा मालमत्ताधारकांसाठी गुंठेवारी नियमितीकरणाची विशेष संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे याचा लाभ नागरीकांनी घ्यावा हि विनंती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow