वंचितने केली परिपत्रकाची होळी...!

 0
वंचितने केली परिपत्रकाची होळी...!

परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -

वंचित बहुजन आघाडीच्या वतीन आज विभागीय उपायुक्त यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांनी 17 जुलै 2025 रोजी शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण सरसगट काढून टाकण्याचे आदेश काढले होते या आदेशामुळे जिल्ह्यातील गायरान अतिक्रमण धारक नागरिक बैचेन झाले होते. 

वंचित बहुजन आघाडी ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील गायरान जमीनीवर प्रशासनानेच विविध घरकुल जसे  पंतप्रधान, शबरी, रमाई अशा घरकुल योजनेचा लाभ गायरान जमीनीवर देण्यात आला आहे या अतिक्रमण करून राहणाऱ्या गरीब भुमिहीन लोकांना 

जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्या सल्ल्याने बेघर करणार आहे का असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विचारण्यात आला. 

 जिल्ह्यातील शासकीय गायरान जमीनीवरील शेती करून उपजीविका भागविण्यासाठी कसत असलेल्या अतिक्रमण धारकांनी परिपूर्ण प्रस्ताव स्वतः तर घराच्या अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रस्ताव तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केले असून त्याला तहसीलदार उपविभागीय अधिकारी हे केराची टोपली दाखवतात यांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन लोकांना न्याय देण्याऐवजी लोक रस्त्यावर कसे येतील या भुमिकेत वागत आहे. 

पालकमंत्री संजय शिरसाट यांना जिल्ह्यातील गायरान जमीनीवर शेती करून उपजीविका भागवीणारे व घरे करून राहणाऱ्या गरीब भुमिहीन कुटुंबांचे अतिक्रमणे हटवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गायरान जमीनी लाटायच्या आहे असा आमचा आरोप आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या अगोदर अनेक वेळेस जिल्ह्यातील गायरान जमीनी अतिक्रमण धारकांच्या नावावर करण्यात याव्यात यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना भेटून निवेदन दिले निदर्शने, धरणे आंदोलन केले एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य विधी मंडळावर मागील पावसाळी अधिवेशनावर मुंबई येथे गायरान अतिक्रमण धारकांच्या हक्कासाठी मोर्चा सुध्दा काढला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व गायरान जमीनीवरील अतिक्रमण नियमाकूल करण्यात असे आश्वासन दिले होते. हे विभागीय उपायुक्त महसूल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.  याही पलीकडे जिल्हाधिकारी यांनी आपल्या परिपत्रकानुसार कार्यवाही चालू ठेवली तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. 

कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या आदेशाची होळी केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, मध्य शहर महासचिव भगवान खिल्लारे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, नितीन भुईगळ, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, सम्पर्क प्रमुख गणेश खोतकर, जिल्हा सचिव सुभाष कांबळे, प्रविण जाधव, गंगापूर तालूकाध्यक्ष शेख युनुस पटेल, भय्यासाहेब जाधव, रवि रत्नपारखे, एस पी मगरे, खुलताबाद तालूका महासचिव राजाराम घुसाळे, प्रभाकर घाटे, विजय घाटे, योगेश घाटे, सुधाकर घाटे, 

आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow