उद्यापासून तीन दिवस दुर्मिळ वाद्य महोत्सव...!

 0
उद्यापासून तीन दिवस दुर्मिळ वाद्य महोत्सव...!

उद्यापासून (दि.9) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज):- सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रविवार दि.9 ते 11 मार्च रोजी दररोज सायंकाळी साडेसहा ते 10 या वेळात तापडीया नाट्यगृह येथे दुर्मिळ वाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. या दुर्मिळ वाद्य महोत्सवाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. या महोत्सवात तीन दिवसात धार्मिक वाद्ये, निसर्गातील वाद्यांवर व दुर्मिळ पारंपारिक वाद्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow