आझाद चौक येथे भीषण आग, 20 ते 22 फर्निचरची दुकाने जळून खाक, कोट्यावधींचे नुकसान

आझाद चौक येथे भीषण आग, 17 हुन जास्त दुकाने जळून खाक, कोट्यावधींचे नुकसान, अगोदर पण लागली होती आग...
शेकडो लोकांचे संसार उघड्यावर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) शहरातील आझाद चौक येथे पहाटे भीषण आग लागल्याने 20 ते 22 लाकडी फर्निचरची दुकाने जळून खाक झाली. या आगीत कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग पहाटे सुमारे साडेपाच वाजता लागली आणि काही मिनिटांतच ती हवेमुळे भडकली. सर्व दुकानांमध्ये लाकडी फर्निचर असल्याने आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...
आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग इतकी भीषण होती की एकाच गाडीने ती नियंत्रणात आणणे शक्य नव्हते. त्यानंतर आणखी चार अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. अग्निशामक दल, पोलिस प्रशासन, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सकाळी 7 च्या सुमारास आग आटोक्यात आली.
दुकानदार आणि कामगारांवर बेरोजगारीचे संकट
या घटनेत फर्निचर दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रत्येक दुकानात 3 ते 4 कामगार काम करत असल्याने दुकान मालक वगळून जवळपास 200 ते 250 कामगार बेरोजगार झाले आहेत. पवित्र रमजान महिना सुरू आहे काही दिवसात ईद येवून ठेपली आहे आणि अशातच हि घटना घडली आणि मालक व कामगारांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आग बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पार्श्वभूमीवर ही आग लागल्याने दुकानदार व कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने यांना आज आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
सरकारी मदतीची मागणी
स्थानिक समाजसेवक आणि नागरिकांनी शासनाकडे नुकसानग्रस्त दुकानदारांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी सुध्दा येथे भंगाराच्या दुकानाला भीषण आग ला
गली होती.
What's Your Reaction?






