उद्या शिवसेनेचे आठवा अजुबा आंदोलन...

 0
उद्या शिवसेनेचे आठवा अजुबा आंदोलन...

शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेनेचे आठवा अजूबा आंदोलन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - शिवाजीनगर भुयारी मार्गाचे घाई घाईत उद्घाटन झाल्याने याला पहिल्याच पावसाळ्यात गळती लागली आहे. या भुयारी मार्गाला गळती लागल्याने प्रवाशांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत असून भुयारी मार्ग खाली पाणी साचत आहे. नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेता शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे आठवा अजूबा आंदोलन करणार आहे.

गुरुवार सकाळी १० वाजता शिवाजीनगर परिसरातील सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, आजी-माजी नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच या भागातील नागरिकांनी आंदोलनात सहभागी होऊन आपला आक्रोश मांडवा, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे व उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow