वक्फ बोर्डाच्या जमिनींचे सर्वेचा पायलट प्रोजेक्ट रेंगाळला, अन्सारी जाणार न्यायालयात

 0
वक्फ बोर्डाच्या जमिनींचे सर्वेचा पायलट प्रोजेक्ट रेंगाळला, अन्सारी जाणार न्यायालयात

वक्फ बोर्डाच्या जमीन मोजनीचा पायलट प्रोजेक्ट रेंगाळला, अन्सारी जाणार उच्च न्यायालयात, अवैध अतिक्रमण काढून जमीन वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यात घ्यावी....

पत्रकार परिषदेत केले जाहीर.‌..

औरंगाबाद,दि.21(डि-24 न्यूज) सन 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे होते त्यांनी राज्यातील वक्फ बोर्डाची जमीन किती आहे याचा सर्वे करण्याचा निर्णय तहरिक ए अवकाफ या संघटनेच्या मागणीनंतर घेतला होता. पुणे आणि परभणी येथे जमीन मोजनीचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला असताना तहरिक ए अवकाफ या संघटनेने त्यावेळी सहकार्य केले होते. राज्य शासनाने सहा कोटी निधी उपलब्ध करून दिला होता पण सध्या जमिनीचे सर्वे बंद आहे. हा पायलट प्रोजेक्ट पण रेंगाळला आहे म्हणून वक्फ बोर्ड हा स्वतंत्र असल्याने राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

2002 मध्ये 91 हजार एकर जमिनीचा उल्लेख होता आता हि जमीन किती याचा अचूक अंदाज येईल यासाठी तहरिक ए अवकाफने सरकारचे लक्ष वेधले होते आता हे काम रेंगाळले असल्याने संघटना आक्रमक झाली आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने अधिका-यांची बैठक घेत सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. अनेक लोकांनी या जमिनीवर अवैध अतिक्रमण केले आहे ते काढावे व तात्काळ सर्वेंचे काम सुरू केले नाही व अवैध अतिक्रमण काढले नाही तर संघटनेच्या वतीने न्यायालयात दाद मागितली जाईल. आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन करण्याचा इशारा शब्बीर अन्सारी यांनी दिला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनींचे स्वरक्षण व्हावे, वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने राज्यभर जनजागृती करत संघटना गेली अनेक वर्षांपासून काम करत आहे.

यावेळी मिर्झा कय्यूम नदवी, मोईन इनामदार, युसुफ निजामी, गुफरान अहमद अन्सारी, अब्दुल अजीम उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow