ईव्हिएमच्या विरोधात क्रांतीचौकातून निघाला मोर्चा...!

ईव्हिएमच्या विरोधात क्रांतीचौकातून निघाला मोर्चा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)
राज्यात सध्या ईव्हिएम विरोधात तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ईव्हिएम विरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विरोधीपक्ष देखील आता ईव्हिएम विरोधात अक्रामक भुमिका घेताना दिसत आहे.
आज सकाळी 11 वाजता जागृत नागरी कृती समितीतर्फे क्रांतीचौकातून क्रांती मोर्चा काढून ईव्हीएम हटविण्याची मागणी करण्यात आली. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सजविलेल्या रथामध्ये संविधानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. तर हातात ईव्हीएम हटावोचे बॅनर घेऊन जागृत नागरी कृती समितीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली. विशिष्ट राजकीय पक्षालाच सत्तेवर बसविण्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाने ही कृती केली. संविधानविरोधी शक्तीचा अदृश्य हात डोक्यावर असल्यामुळे संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी केला. त्यामुळे ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात प्रा. भारत सिरसाट, प्रा. मच्छिन्द्र गोर्डे, जितेंद्र भवरे, संविधान विश्लेषक अनंत भवरे, अनिसचे कार्यकर्ते भाऊसाहेब पठाडे, कैलास तवार, बोदडे, रामदास वाघमारे, सविता अभ्यंकर, रामदास अभ्यंकर, मधुकर गवदे, रतनकुमार साळवे, बाभळे, दैवशाला गोवंदे यांनी सहभाग घेतला.
What's Your Reaction?






