इम्तियाज जलील यांची "चाय पे चर्चा" इफ्तार पार्टीत हजेरी
इम्तियाज जलील यांची चाय पे चर्चा, इफ्तार पार्टीत जनतेशी संवाद
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) सर्व राजकीय पक्षांच्या अगोदर एमआयएम पक्षाने विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केली. हे दोन्ही नेते मागिल लोकसभा निवडणुकीत एक दुस-याच्या विरोधात मैदानात होते. इम्तियाज जलील यांनी उमेदवारी मिळाली त्यानंतर पवित्र रमजान महिना सुरू झाला. त्यांनी शहरातील विविध भागात आयोजित इफ्तार पार्टीत हजेरी लावली व जनतेशी संवाद साधला. ईद नंतर ते प्रचाराला सुरुवात करणार आहे. काही दिवस अगोदर त्यांनी बुढीलेन भागात भेट देऊन नागरीकांच्या भेटी घेतल्या. आज शहागंज येथील एका चहाच्या हाॅटेलात चहा पित नागरीकांशी चाय पे चर्चा करताना दिसून आले. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी उपस्थित होते. चंद्रकांत खैरे यांनीही कार्यक्रमात हजेरी लावत भेटीगाठी सुरू केली आहे. तर वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी मागिल तीन दिवसांत ग्रामीणचा दौरा कर वंचितच्या कार्यकर्त्यांशी भेट घेत परिचय दिला. यावेळी त्यांचेही कार्यकर्त्यांनी स्वागत केले. ईद नंतरच प्रचाराला सुरुवात होईल असे चित्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहे. मतदान 13 मे रोजी आहे तर मतमोजणी 4 जूनला होईल.
What's Your Reaction?