भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कथित वक्तव्याने खळबळ, गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
भाजपाचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जनभावना दुखावल्या बद्दल गुन्हा दाखल करा- शहर जिल्हा काँग्रेसची मागणी
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) आज रोजी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्त मनोज लोहिया यांना चर्चा करून निवेदन देण्यात आले, बहीण भावाच्या पवित्र नात्याला गालबोट व काळिमा फासण्याचे वक्तव्य मुनगंटीवार यांनी काल दि.8 एप्रिल 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील भाजपच्या प्रचार सभेत केले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त व बेजबाबदार वक्तव्याने महाराष्ट्र व देशभरात असंतोष निर्माण झाला आहे, करिता औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
लोकसभा निवडणूका जवळ व आचारसंहिता सुरू असताना भाजप पक्ष नीच पातळीचे राजकारण भाजपा करीत आहे. राजकारणाची इतकी पातळी खालवली आहे की हे भाषण ऐकून मन सुन्न झाले आहे अशी ही विकृती समाजात कलंक आहेत. यातून भाजपाचा खरा चेहरा समोर आला की तुम्ही महिला तुच्छ, हीन, वयक्तिक टीके शिवाय मत घेऊ शकत नाही. महिला विरोधी, गलिच्छ मानसिकता पुन्हा सिद्ध झाली आहे लज्जास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध करीत निवडणूक आयोगाने सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा उमेदवारी रद्द करून जनभावना दुखावल्या बद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी औंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.
भाजप कडे जर थोडी जरी नैतिकता उरलेली असेल तर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातून हकालपट्टी करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ.अरुण शिरसाट (वरिष्ठ उपाध्यक्ष, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), शहर जिल्हा काँ्रेस कमिटिचे सरचिटणीस अनिस पटेल, डॉ.निलेश आंबेवाडीकर (प्रवक्ता शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), मदन काका सातपुते, प्रा.शिलवंत गोपणारायन, संजय धर्मरक्षक, अनिता भंडारी, मंजुताई लोखंडे, विद्याताई घोरपडे, शकुंतला साबळे, विनायक सरवदे, सुनील साळवे, शिरीष चव्हाण, शाहरुख खान, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?