ओबीसी मेळाव्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी येणार...!

ओबीसी मेळाव्यासाठी येणार राहुल गांधी, प्रियंका गांधी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) जून महीन्यात शहरात भव्य ओबीसी समाजाचा मेळावा काँग्रेस ओबीसी प्रदेश विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारला भाग पाडणारे विरोधीपक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार प्रियंका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भाणूदास माळी यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला यामुळे ओबीसी व इतर समाजाला न्याय मिळेल. परंतु जातीनिहाय जनगणना कधी होणार सरकारने निश्चित करावे अशी मागणी केली.
काल सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका घेण्याचे राज्य सरकारला आदेश दिले. ओबीसी आरक्षण बाधित ठेवत या निवडणूका घेण्याचे आदेश दिल्याबद्दल पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार डाॅ.कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आतिष पितळे, शहराध्यक्ष अनिल मालोदे, मराठवाडा अध्यक्ष कांचन कुमार चाटे, जगन्नाथ काळे, अनिस पटेल, अनिता भंडारी, रवि काळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






