राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक, पडळकर यांच्या विरोधात केले तीव्र आंदोलन
 
                                गोपीचंद पडळकर यांनी औकतीत राहावे - जिल्हाध्यक्ष इंजि. धनश्री तडवळकर
राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जोडे मारून एन-11 राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करून जाहीर निषेध....
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा गोपीचंद पडळकर यांना सज्जड दम...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज)
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह पवार घराण्यावर अतिशय नीच वृत्तीची टीका केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष धनश्री तडवळकर यांच्या वतीने गोपीचंद उर्फ टोपीचंद या मंगळसूत्र चोराचा जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
ज्याला स्त्रीचे सौभाग्य असलेले मंगळसूत्र ही कमी पडते त्याला आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे मंगळसूत्र भेट देणार आहोत.
ज्या शरदपवार साहेबांना एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देशात मान्यता आहे. याचे भान त्या टोपीचंदला राहिले नसेल पण त्या टोपीचंदाने स्वतःच्या पक्षाच्या असलेल्या आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे वक्तव्य एकदा जरूर ऐकावे की, तेच मोदी स्वतः आमच्या पवार साहेबाना आदर देतात तू कोण कुठला तुझी लायकी काय तू स्वतःच डिपॉझिट वाचवू शकत नाहीस आणि तू इतक्या मोठ्या नेत्याबद्दल बोलताना सूर्यावर थुंकल्यासारखे विधान करतोस ती घाण तुझ्याच तोंडावर पडते हे आता तरी तुला कळायला हवे. राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने पडळकराच्या छायाचित्राला चप्पल मारुन महिलांनी त्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
हा टोपीचंद फक्त देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेला पाळीव कुत्रा आहे. तो देवेंद्र यांचा सुपारी बहाद्दर आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी पवार घराण्यावर टीका करणे आणि प्रसिद्धी मिळवणे हाच त्याचा धंदा आहे. म्हणण्याचा उद्देश हाच की ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किती पक्षाच्या टोप्या बदलल्या आणि आमदार होण्यासाठी कुणाकुणाला टोप्या घातल्या याचा आत्मपरीक्षण त्यांनी करावे. जो स्वतःच्या स्वतःच्या समाजाचा होऊ शकला नाही ज्याने स्वतःच्या दैवताची खोटी शपथ घेतली. अशा नीच प्रवृत्तीचा आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस जाहीर निषेध करतो आणि याप्रसंगी मी पडळकर यांना एकच सांगेन यापुढे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि पवार घराणं त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करणारा कुठल्याही नेत्याच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या नादी लागला तर महाराष्ट्र राज्य युती काँग्रेस तुला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.
एका स्त्री बद्दल बोलताना आपण कोणत्या थराची भाषा वापरतोय हे संस्कार एका मंगळसूत्र चोराला काय असणार, त्याच्या पक्षाची त्याला हीच शिकवण आहे काय?
असा सवाल युती जिल्हाध्यक्ष धनश्री तडवळकर यांनी केला.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, सुधाकर सोनवणे, युवक प्रदेश सचिव आशिष पवार, युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे, वनमाला जाधव, प्रगती उंडाळे, ऋतुजा सोनावणे, शुभांगी कुदळे, अदिती साखरे, आदी महिला व युवती उपस्थित होत्या.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            