गोसेवा आयोगाच्या नोंदणीकृत गाईंच्या पालन पोषण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

गोसेवा आयोगाच्या नोंदणीकृत गाईंच्या पालन पोषण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3 (डि-24 न्यूज) – जिल्ह्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रति दिन प्रति पशु 50 रुपये अनुदान योजने अंतर्गत अर्ज करण्यास 10 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,
असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.
नोंदणसाठी http://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे.
जिल्ह्यातील पात्र गोशाळा, गोसदन पांजरपोळ व गोरक्षण संस्थानी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि.1 ते 10 जुलै या कालावधीत अर्ज करण्यास द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे. गोसेवा आयोगामार्फत प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी दि.11 ते 17 जुलै, जिल्हा गोशाळा पडताळणी समिती द्वारा प्राथमिक तपासणीअंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी दि.18 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत, जिल्हा गोशाळा पडताळणी समिती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या आयोग कार्यालयास कळविणे दि.19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट असे वेळापत्रक आहे,असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?






