कामगार गृह उपयोगी वस्तू संचाचे कोणी पैसे मागितले तर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी

 0
कामगार गृह उपयोगी वस्तू संचाचे कोणी पैसे मागितले तर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3 (डि-24 न्यूज) – महाराष्ट्र इमातर व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटप करण्यात येते. सर्व कामकाज हे www.mahabocw.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे निशुल्क करण्यात येते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत जिवीत, सक्रीय कामगारांना मे.मफतलाल इंडस्ट्रीज लि. मुंबई या संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहपयोगी संचाचे वाटप करण्यात येते. संच कुटुंबातील (पती / पत्नी) करीता एकच अनुज्ञेय राहणार आहे. गृहपयोगी संचाचे वाटप मंडळाच्या दि.30 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये निश्चित दिनांक भेट पद्धत Appoinment System नुसार होणार असून मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट देऊन लाभार्थ्यांनी अपाईटमेंट घेऊन संच मिळवण्यासाठी संच वाटपाचा दिनांक व वितरण केंद्र याची निवड करावी. कामगाराने त्याने निवडलेल्या दिनांकास मंडाळोच ओळखपत्र अथवा आधार कार्ड व नियुक्ती पत्र घेऊन निवडलेल्या वितरण केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर ऑनलाईन प्रणाली प्रक्रियेनंतर कामगारांना प्रत्यक्ष संच ताब्यात देण्यात येईल.

वाटप पूर्णत : निशुल्क असून कोणत्याही एजंट, संघटना अथवा त्रयस्थ व्यक्ती यांच अमिषाला व दबावाला बळी पडू नये व त्यांचेशी कोणतेही आर्थिक व्यवहार करु नये. कोणत्याही व्यक्ती कडून नोंदणी, नुतनीकरण व लााभासाठि पैशाची मागणी केल्यास त्यांचे विरोधात जवळचे पोलीस स्टेशन व या कार्यालयास तक्रार दाखल करावी असे आवाहन सहायक कामगार आयुक्त ग.भा.बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow