मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे उमेदवारी अर्ज दाखल करणार...!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे २५ तारखेला आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार
महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीने करणार शक्तिप्रदर्शन
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज )औरंगाबाद लोकसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार संदिपान भुमरे हे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.२५) महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करणार असून भव्य रॅलीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतील. क्रांती चौक येथे सकाळी ९ वाजता महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
जनतेच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य मला अपेक्षित असून आपलीच जागा निवडून येणार याचा विश्वास यावेळी महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत औरंगाबाद लोकसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठक प्रसंगी आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबाते, रामू काका शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, जालिंदर शेंडगे, लक्ष्मीकांत थेटे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष, संजय ठोकळ, मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, वैभव मिटकर, महानगर प्रमुख बिपिन नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत, रमेश पवार, केतन काजे, प्रहारचे सुधाकर शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख Add अमित गीते, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कटारे, भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर, ग्रामीण च्या पुष्पाताई गव्हाणे, सुलभा भोपळे, मनसे च्या महिला जिल्हाध्यक्ष लिला राजपूत, यांची उपस्थिती होती.
असा असेल उमेदवार संदीपान भुमरे यांचा संपर्क दौरा...
महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मध्यवर्ती कार्यालयात महायुतीतील विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.२२) बैठक घेण्यात आली. या नियोजन बैठकीत मंगळवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता महायुतीच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात महायुतीच्या सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुढील प्रचार, नियोजन, विविध कॉर्नर बैठका, प्रचार सभा तसेच लोकसभा नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक होईल.
बुधवार, दिनांक २४ एप्रिल, सकाळी १० वाजता औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ शहर तसेच ग्रामीण भागातील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक होईल
शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल, सकाळी १० वाजता...
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे हे लोकसभा मतदार संघातील विविध विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नागरिक, ग्रामस्थांशी वयक्तिक भेट घेऊन संवाद साधतील
शनिवार, दिनांक २७ एप्रिल, सकाळी १० वाजता
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ वैजापूर विधानसभा मतदार संघातील सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्कल निहाय बैठका घेण्यात येणार असून वैजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनात या बैठका तसेच ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधून उमेदवार संदीपान भुमरे हे गाठी भेटी घेतील.
रविवार, दिनांक २८ एप्रिल, सकाळी १० वाजता
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे हे आपल्या सोयीनुसार औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील मतदारांशी वयक्तिक गाठी भेटी घेऊन संवाद साधतील.
सोमवार, दिनांक २९ एप्रिल, सकाळी १० वाजता
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ कन्नड विधानसभा मतदार संघातील सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्कल निहाय बैठका घेण्यात येणार असून ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधून उमेदवार संदीपान भुमरे हे गाठी भेटी घेतील.
मंगळवार, दिनांक ३० एप्रिल, सकाळी १० वाजता...
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ गंगापूर विधानसभा मतदार संघातील सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्कल निहाय बैठका घेण्यात येणार असून ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधून उमेदवार संदीपान भुमरे हे गाठी भेटी घेतील.
What's Your Reaction?