शहर आणि जिल्ह्यात तब्लिगी उमुमी इज्तेमा 17 ते 27 नोव्हेंबर पर्यंत

 0
शहर आणि जिल्ह्यात तब्लिगी उमुमी इज्तेमा 17 ते 27 नोव्हेंबर पर्यंत

शहर आणि जिल्ह्यात तब्लिगी इज्तेमा, तयारी पूर्ण

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) नोव्हेंबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यात टप्प्या टप्प्यात शहर आणि जिल्ह्यात तब्लिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांच्या अंतराने विभागून दोन दिवस यावेळी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मागिल एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. तयारी आता शेवटच्या टप्प्यात आहे. झोन नुसार यंदा इज्तेमाची तयारी करण्यात आली आहे. पहिल्यांदाच असे नियोजन केले आहे. 17 ते 27 नोव्हेंबर पर्यंत तब्लिगी उमुमी इज्तेमा होणार आहे. 17 नोव्हेंबर पासून शहरातून इज्तेमा सुरू होणार आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव इज्तेमासाठी उपस्थित राहणार आहेत.

नेहमी शहर आणि जिल्ह्यात एकाच ठिकाणी हजारो एकर जमीनीवर इज्तेमाचे आयोजन केले जाते यामध्ये लाखो लोक एकाच ठिकाणी जमा होत दुवा केले जाते पण यंदा विभागून झोन नुसार हे आयोजन केले आहे. 

इज्तेमागाहमध्ये धर्मगुरु मार्गदर्शन करणार आहे.

 हजारो भाविक इज्तेमासाठी येणार आहे. हजारो स्वयंसेवक इज्तेमागाहमध्ये रात्रंदिवस काम करत आहे. देशात व जगात अमन व शांतता प्रस्थापित व्हावी, भाईचारा कायम राहावे अशी दुवा या इज्तेमागाहमध्ये करण्यात येणार आहे. या इज्तेमागाहमध्ये इज्तेमाही सामुहिक विवाह व हजारो जमात धर्माचे प्रसार करण्यासाठी निघणार आहे.

या तारखेला येथे होणार इज्तेमा....

हर्सूल येथे 17 व 18 नोव्हेंबर, रेल्वेस्टेशन परिसर , अफान काॅलनी 18 व 19 नोव्हेंबर , सोलापूर हायवे देवलाई येथे 19,20 नोव्हेंबर, मिसारवाडी 19 व 20 नोव्हेंबर, वाळूज 20 व 21 नोव्हेंबर, नारेगाव 21 व 22 नोव्हेंबर, जामा मस्जिद 22 व 23 नोव्हेंबर, पाचोड 23 व 24 नोव्हेंबर, शेंदूरवादा 24,25, पिशोर 25,26, सिल्लोड 26,27, तिडका 27,28, शिवना 19,20, गंगापूर 20,21, कारखाना फुलंब्री 21,22, कन्नड 22,23, खुलताबाद 23,24, खंडाळा 23,24, पिंपरी राजा 25,26, बिडकीन 26, 27 नोव्हेंबर रोजी इज्तेमा होणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow