आनंदाच्या शिधा वाटपात मशिनचे विघ्न... लाभार्थ्यांची गर्दी वाढली

 0
आनंदाच्या शिधा वाटपात मशिनचे विघ्न... लाभार्थ्यांची गर्दी वाढली

आनंदाच्या शिधा वाटपात मशिनचे विघ्न, 10 ते 15 टक्के शिधांचा पुरवठा कमी... रेशन दुकानांवर वाढली गर्दी... जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना दहा दिवसांत मिळतील का आनंदाच्या शिधा...

औरंगाबाद,दि.20(डि-24 न्यूज) श्री गणेशचे राज्यात धुमधडाक्यात आगमन झाले. गणेशोत्सव हा सण राज्यातील जनतेने उत्साहात साजरा करावा यासाठी रास्त भाव अन्नधान्य दुकानातून रेशनकार्ड धारकांना आनंदाच्या शिधा देऊन उत्सव गोड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण शिधा वाटपात थम्ब मशिनचे विघ्न येत असल्याने रेशन दुकानदार त्रस्त झाले आहेत. एका लाभार्थीचे तीनदा अंगठा मशिनवर घ्यावा लागत असल्याने अर्धा तास एका लाभार्थीला लागत असल्याने रेशन दुकानांवर गर्दी वाढत आहे. रेशन दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांनी शासनाला विनंती केली आहे. कोरोना काळात ज्या प्रकारे सुट देण्यात आली होती, लाभार्थीला मशिनवर थम्ब न देता अन्नधान्य दुकानातून वितरण करण्यात आले होते त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यांपर्यंत सुट देण्यात यावी. कारण एकामागून एक सण उत्सव असल्याचे रेशन दुकानदार यांना त्रास होणार नाही व लाभार्थींचा पण वेळ वाचेल अशी मागणी केली आहे. 

जिल्ह्यातील व शहरातील दहा टक्के आनंदाच्या शिधा कमी पुरवठा झाला असल्याने पण रेशन दुकानदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 60 टक्के लाभार्थीला आनंदाची शिधा वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 1802 तर शहरात 199 रेशन दुकान आहे. लाभार्थी लाखो आहे. पुरवठा विभाग शिधा वेळेवर लाभार्थीला मिळावे यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहा दिवसांत शंभर टक्के वाटप करण्यात येणार आहे. मशीनमध्ये तांत्रिक समस्या नेट स्लो ची आहे. म्हणून काही दुकानातून मंद गतीने वाटप होत आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला डि.एन.पाटील यांनी दिली आहे.

आनंदाच्या शिधा वर गणेशजी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र आहे. छगन भुजबळ ,मंत्री अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, यांनी हार्दिक शुभेच्छा संदेश शिधांच्या पिशवीत दिला आहे. एक शिधा एक रेशनकार्ड वर एक शंभर रुपयांत मिळत आहे. यामध्ये एक किलो चनादाळ, एक किलो साखर, रवा एक किलो, खाद्यतेल एक लिटर मशिनवर अंगठा लावताना पिशवीत चार पाकिट असल्याचे खात्री करून घ्यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow