उध्दव सेना व भाजपात राडा, जालना रोड काही काळ रस्ता जाम
उध्दव सेना भाजपात राडा, पोलिसांना तणाव दूर करण्यासाठी करावा लागला सौम्य लाठीचार्ज, उध्दव सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची केली मागणी...
आदित्य ठाकरेंनी या राड्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे निवडणूका आहे लढाई नाही...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज) जालना रोड, रामा इंटरनॅशनल हाॅटेलसमोर उध्दव सेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला. तणाव शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या राड्यामध्ये जालना रोड काही तास जाम झाला होता.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली येथे बदलापूर घटनेनंतर राज्यात तात्काळ शक्ती कायदा लागू करावा. या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार होते. याच वेळी प्रती आंदोलन भाजपाचे हर्षवर्धन कराड यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते दिशा सलेन हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रकरणात चौकशी बंद केली होती. या प्रकरणात जनाब उध्दव ठाकरे व जनाब आदीत्य ठाकरे यांची काय भुमिका आहे याचा जाब विचारण्यासाठी आलो होतो. महीला अत्याचारावर महाविकास आघाडी जे आंदोलन करत आहे ती नौटंकी आहे असा आरोप कराड यांनी केला.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केला की शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. भाजपा आंदोलन करत आहे त्यांना पोलिस काही बोलत नाही. शिवसैनिकांवर जसा दबाव आणला जात आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना सुध्दा ताब्यात घ्यावे. त्यांच्यावरही कारवाई करावी शिवसैनिकांवर जशी कार्यवाही केली. एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार आदीत्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली. शक्ती कायदा आम्ही आणला केंद्र सरकारने महीला अत्याचार रोखण्यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी. काल शिवसेनेने पंतप्रधान यांच्या दौ-यावेळी शांततेत आंदोलन केले मग आज भाजपाने प्रती आंदोलनाची काय गरज होती. सरकार महायुतीचे आहे त्यांच्या आदेशाचे पालन करुन पोलिस कारवाई करत आहे असा आरोप के
ला.
What's Your Reaction?