मनपावर धडकला एमआयएमचा मोर्चा...!
मनपावर धडकला एमआयएमचा मोर्चा...!
डिपी प्लॅनला आरेफ काॅलनी वार्डातील नागरीकांचा विरोध, मुस्लिम बहुल वार्डात दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने ओरड...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज) वार्ड क्रं.19, आरेफ काॅलनी वार्डातील मोठा भाग नवीन विकास आराखड्यात मंजूर रेखांकनात ग्रीन झोनमध्ये टाकल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. हा भाग रेखांकनातून वगळावा व शहरातील मुस्लिम बहुल वार्डात दहा ते बारा दिवसाआड पाणी नळाला येत असल्याने एमआयएमच्या वतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वार्डातील माजी नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांच्या नेतृत्वाखाली आरेफ काॅलनी वार्डातून मनपा मुख्यालयापर्यंत काढण्यात आला. यामध्ये वार्डातील नागरिक व महीला मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा झेंडा घेत हा मोर्चा मनपावर दुपारी तीन वाजता धडकला. मनपाच्या गेटवर मनपाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांची शिष्टमंडळाने मागणीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे नवीन आराखड्यात हिलाल काॅलनी व जलाल काॅलनी या वसाहती मधील लोकांच्या घरावर नदी दर्शवण्यात आली जे दुरुस्त करून घ्यावे. खाम नदीला लागून जी वस्ती आहे त्या वस्तीवर तसेच नदीवर शंभर फुट डिपी रस्ता टाकण्यात आला आहे. ज्याची गरज नसून तो रस्ता रद्द करण्यात यावा. टी.बी.हाॅस्पिटल ते जलाल काॅलनी पर्यंतचा 50 फुट डीपी रस्ता अर्धवट असून त्यामुळे अपघात घडत आहेत तो रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. आरेफ काॅलनी तसेच जुन्या शहराला दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी गटनेता नासेर सिद्दीकी, माजी विरोधीपक्षनेते जमीर अहेमद कादरी, माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, अबुल आला हाश्मी, रफीक शेख, रफीक पालोदकर, अब्दुल अजीम, नासेर खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?