हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात, तिरंगा यात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले...!
 
                                हर घर तिरंगा अभियानाची विविध उपक्रमांनी सुरुवात...
तिरंगा यात्रेने वेधले शहवासीयांचे लक्ष...
शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने देशभक्तीपर वातावरण...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज)
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून "हर घर तिरंगा" मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम लोकांनी घरी तिरंगा लावण्यासाठी व लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी "हर घर तिरंगा" मोहीम लोक चळवळ बनली असून राज्यात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेने शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले.
आज दि.13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वा. क्रांतीचौक ते संत एकनाथ रंगमंदिर पर्यंत व तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी तिरंगा शपथ घेण्यात आली. तसेच तिरंगा कॅनव्हास वर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी शुभेच्छा संदेश लिहिले. तसेच या ठिकाणी तिरंगा सेल्फी पॉइंट वरती जवळपास 100 ते 150 नागरिकांनी सेल्फी घेतली. यानंतर क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिर पर्यंत मनपा शालेय विद्यार्थ्यांच्या लक्षणीय उपस्थित तिरंगा यात्रा काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी लेझिम व बँड पथका ने शहर वासियांचे लक्ष वेधले.
सर्वांच्या हातात असणाऱ्या तिरंगा ध्वजाने व जय घोशाने अवघे वातावरण देशभक्तीमय झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,संतोष वाहुळे, उप आयुक्त रवींद्र जोगदंड, अपर्णा थेटे, मुख्या लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील,आरोग्य अधिकारी अर्चना राणे, कार्यकारी अभियंता फारुख खान, शिक्षणाधिकारी भारत तीन गोटे, सहायक आयुक्त संजय सुरडकर, रमेश मोरे, बी.के परदेशी ,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिक अहमद, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने देशभक्तीपर वातावरण...
यानंतर संत एकनाथ रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात मनपा शाळेतील जवळपास 259 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करून विविध आविष्काराचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी संपूर्ण वातावरण देशभक्ती माय झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यां
 
 
नी केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            