मनपाने पथविक्रेत्यांना जागा निश्चित करुण द्या - आमदार संजय केनेकर

पथविक्रेता एक सामाजिक व्यवस्था आहे, त्यांची सोयीसुविधा केली पाहिजे, आमदार केणेकर...
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत मनपा मार्फत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि. 29(डि-24 न्यूज)-पथविक्रेता म्हणजे आपल्या जीवनातील आवश्यक त्या वस्तू आपल्या पर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आहे यांची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन आमदार श्री संजय केणेकर यांनी आज केले.
मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आज दि. 29 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत लोक कल्याण मेळावाच्या अध्यक्षस्थानी श्री केणेकर होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
शहरातील जवळपास 14,000 पथविक्रेता आहेत यांची जागा निश्चित करण्याची गरज आहे, ते पुढे म्हणाले.
पथविक्रेता आपली सामाजिक व्यवस्था आहे आणि त्यांची काढजी घेणे आपले आणि महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, केणेकर म्हणाले.
पीएम स्वानिधी योजनेतील अन्नप्रक्रिया व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज प्रशिक्षण कार्य शाळेचे
आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून प्राप्त आदेशान्वये तथा मार्गदर्शक सूचना अन्वये प्रधानमंत्री पथ विक्रेता योजनेचा लाभ घेतलेले असे पथविक्रेते जे की अन्नप्रक्रियेशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेशित केले होते. सदरील मेळाव्यात FSSAI विभागाच्या वृषाली दुबे यांनी अन्न प्रक्रियाशी संबंधित पथविक्रेत्यांना प्रशिक्षण दिले. सदरील कार्यशाळेस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त लखीचंद चव्हाण, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, कमलाकर कदम, भरत मोरे, सुरेंद्र पाटील, माजिद शेख, शोएब सय्यद, मंगल जाधव, ललिता दाभाडे, सुनिता कुलकर्णी, शारदा खरात, सविता आगळे आदी कर्मचारी उपस्थित होते व बहुसंख्येने पथविक्रेते व महिला उपस्थित होत्या.
सदरील प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला व पथविक्रेत्यांना अन्न प्रक्रिया विभागामार्फत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ही वाटप करण्यात येणार आहेत ज्यामुळे सर्व पथविक्रेत्यांना व महिलांना अन्नप्रक्रियेचे परवाना काढण्यासाठी मदत होणार आहे.
महानगरपालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजने अंतर्गत शहरातील आतापर्यंत एकूण 42851 लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. यामध्ये सदर कर्ज तीन टप्प्यामध्ये देण्यात आले,
प्रथम टप्पा एकूण 36515 लाभार्थ्यांना 10,000 रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे तर दुसरा टप्प्यातील एकूण 5665 लाभार्थ्यांना प्रत्यक्ती 20,000 याप्रमाणे व 671 लाभार्थ्यांना 50,000 प्रत्येकी प्रमाणे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत मोरे यांनी तर प्रास्तविक कमलाकर कदम यांनी व आभार प्रदर्शन सुनीता कुलकर्णी यांनी केले.
What's Your Reaction?






