महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहिर, हरकती 4 सप्टेंबर पर्यंत सादर करु शकता

महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहिर, हरकती 4 सप्टेंबर पर्यंत सादर करु शकता
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) -
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2025 साठी निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. महापालिका इमारत नंबर - 3 मध्ये निवडणूक विभागाने भींतीवर नकाशा व प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यासाठी त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी 29 प्रभागाची यादी जाहिर केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार वार्गाचा एक प्रभाग असणार आहे. महापालिका निवडणूक लढणा-या इच्छूकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. हरकती व सूचना शुक्रवार 22 ऑगस्ट ते गुरुवार 4 सप्टेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत महापालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात. हरकती व सूचना दाखल करणा-या नागरीकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. अशी माहिती मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांनी दिली आहे.
महापालिका निवडणूक - 2025, अखेर प्रभाग रचना जाहिर, 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना...
प्रभाग क्रं. 29 सर्वांत लहान, सर्वात मोठा प्रभाग क्रं.22
एकूण 29 प्रभागात 12 लाख 28 हजार 32 लोकसंख्या
महापालिकेमध्ये एकूण 29 प्रभाग तयार करण्यात आले असून यामध्ये प्रभाग क्रमांक 22 हा सर्वात मोठा लोकसंख्येचा तर प्रभाग क्रमांक 29 हा सर्वात लहान लोकसंख्येचा ठरला आहे.
प्रभाग क्रमांक 22 मध्ये 46,676 तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये 29,149 एवढ्या लोकसंख्येचा समावेश करण्यात आलेला आहे.
महापालिकेच्या टप्पा क्रमांक तीन इमारत मध्ये शनिवारी प्रभाग रचनेचा आराखडा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
शासनाने यंदा वार्ड ऐवजी प्रभाग निहाय रचना करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. तसेच एका प्रभागात 4 वार्ड चा समावेश रचना करण्याचे आदेश दिले होते. प्रभाग रचनेमध्ये 29 प्रभागांपैकी तब्बल 7 प्रभागांमध्ये 46 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेचा आराखड्यावर 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 22
विद्यानगर, गिरीजादेवी कॉलनी, परिमल सोसायटी, अलंकार कॉलनी, नंदिग्राम कॉलनी, गजानन कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, चैतन्य सोसायटी, भूषण नगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, दुर्गामाता कॉलनी, चौधरी कॉलनी, पुंडलिक नगर, मातोश्रीनगर, गजानननगर, हनुमान नगर भागशा, विवेकानंद नगर, स्पंदन नगर, गणेश नगर, भारत नगर, गुरुदत्त नगर, छत्रपती नगर मोहर नगर, मानक नगर.
प्रभाग क्रमांक 29
कासलीवाल मार्व्हल, एमआयटी कॉलेज परिसर, शीतल नगर, सातारा गाव, शंकर नगर, अभिनंदन सोसायटी, अमीर नगर, सुधाकर नगर, ऑरेंज सिटी, शहा नगर, कांचनवाडी, काश्मिरीनगर, समता नगर, संताजी धनाजी नगर, नक्षत्रवाडी, दिशा सिल्क सिटी, इटखेडा रोड.
या प्रभागात आहे एससीची सर्वाधिक लोकसंख्या
महापालिकेच्या प्रभाग रचनेतील 29 प्रभागांपैकी सात प्रभागांमध्ये एससी लोकसंख्या ही सर्वाधिक आहेत यात. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 13467, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 14390, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 12420, प्रभाग क्रमांक 9 मध्ये 16525, प्रभाग क्रमांक 18 मध्ये 11345, प्रभाग क्रमांक 24 मध्ये 19383, प्रभाग क्रमांक 28 मध्ये 17757.
या प्रभागात आहे एसटीची सर्वाधिक लोकसंख्या
प्रभाग क्रमांक एक मध्ये 1295, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1055 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये 1057.
What's Your Reaction?






