शिवसेनेचे निष्ठावंत शिवसंपर्क मोहिम पुर्वतयारी शिबिर संपन्न...

शिवसेनेचे निष्ठावंत शिवसंपर्क मोहीम पूर्वतयारी शिबिर संपन्न...
संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) - : शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसंपर्क मोहीम पूर्वतयारी शिबीर शहरातील मराठवाडा साहित्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज शनिवार 23 ऑगस्ट रोजी संपन्न झाले. आगामी काळात होणाऱ्या सर्व संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याचा शिवसैनिकांनी एकमुखाने निर्धार यावेळी केला. शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची या शिबिरास प्रमुख उपस्थिती होती तर शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली हे शिबिर पार पडले.
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अनिल देसाई, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन रवींद्र मिर्लेकर तर माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्योतीताई ठाकरे यांनी करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे पाटील यांनी प्रथम सत्राची सुरुवात केली. युवा वायुगतीने धावणार या विषयावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या तरुणाला शासन व्यसनाधीनतेमध्ये अडकवत असताना ते युवागतीने धावणार कसे असा प्रश्न उपस्थित करत जपान देश अणुबॉम्ब हल्ल्यानंतर उभा राहू शकतो तर शिवसेना पक्ष या छोट्याशा गद्दारीने उभा राहू शकणार नाही का...? शिवसेना पक्ष उभा राहत असताना युवासेना कायम त्याच्या पाठीशी उभी राहील, असा ठाम विश्वास डमाळे यांनी व्यक्त केला.
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आता संघर्षाचे दिवस आहे. मात्र तरीही हा पक्ष 80 टक्के समाजकारण असेच काम करणार आहे. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी महागाई विरोधात आवाज उठवणार असून महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या प्रश्नाबाबत रान पेटवणार असल्याचे महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार यांनी सांगितले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेने शिवसेनेने मराठवाड्यात प्रवेश केला. संभाजीनगर महानगरपालिकेत आतापर्यंत शिवसेनेचे 14 महापौर झाले असून सातत्याने शिवसेनेचा येथे शिवेसेनेचा दबदबा राहिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडणून आणण्याचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी केले.
जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. गद्दार गटाच्या हातात सत्ता गेल्यामुळे शिवसैनिकांची हिंमत खच्चीकरण होणे साहजिक आहे. मात्र सातत्य आणि प्रमाणिक हेतू ठेवला तर आपला पक्ष चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकू शकतो, अशी आशा राठोड यांनी व्यक्त केली.
द्वितीय सत्राची शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी सुरुवात केली. शिंदे गट आणि शिवसेनेची आताची कौरव आणि पांडवाची लढाई आहे. कौरव शिंदे गट तर शिवसेना पांडवाच्या भूमिकेत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे.. एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प केला होता.. मात्र दुप्पटीने आत्महत्या होत आहे. देशाचे जवान शहीद होत आहे..सैन्याप्रमाणे शिस्तीने लढाई लढल्यास युद्ध जिंकता येते, शिंदे गटाविरोधात सुद्धा आपण युद्ध जिंकू असा विश्वास वडले यांनी व्यक्त केला.
शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी आम्ही शिवसेने सोबतच या विषयावर भावना प्रकट केली. शिवसेने सोबत लोकांचे प्रेम मोठे आहे. हनुमान प्रमाणे आमची निष्ठा आहे.. गद्दार गट हनुमान चालीसा पठण करतात मात्र त्यांच्यामध्ये निष्ठा आहे. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे खरी शिवसेना.. शिवसेना तळगालातील लोकांचे विचार करते. शिवसेनेने मराठी माणसाला मान दिला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला व्यापक रूप दिलं. महाराष्ट्र धर्माचा विचार पुढे नेण्याचे काम आदित्य ठाकरे करत आहे. शिवसेनेला इतिहास, वसा आणि वारसा असून शिवसेनेला उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन ठाकरे यांनी केले.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी राजकीय आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
शिवसेनेनेसमोर आव्हाने नाहीतर संधी आहे. आमदाराच्या जाचातून शिवसेना बाहेर पडली आहे. सर्व शिवसैनिक यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे..गद्दार गट प्रभाग रचना आपल्याला पोषक करण्यासाठी योजना आखतील. प्रभाग रचनाकडे लक्ष देऊन हरकती नोंदवाव्या, अशी सूचना करत विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी चांगले काम केले असल्याचे कौतुक घोसाळकर यांनी केले.
शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी मतचोरी आणि सावधानता या विषयावर मनोगत व्यक्त केले. संपूर्ण देशात मत चोरी बाबत आंदोलन सुरू आहे. निवडणूक आयोग चोर आहे की काय अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. सर्व विरोधी पक्ष आंदोलन करत आहे.. तरीही निवडणूक आयोग शपथ पत्र देण्याचे आवाहन करत आहे. पक्षाचा बूथप्रमुख असेल तर मत चोरी होणार नसल्याची भूमिका मिर्लेकर यांनी मांडली.
तृतीय सत्राची शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. संघटन आणि पुनर्बांधणी या विषयावर त्यांनी सविस्तर शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे.. साधारणतः डिसेंबर ते जानेवारीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होईल. गद्दारीच्या रूपाने दुसरे कोविड शिवसेनेवर संकट आल होते. निवडणूक लढविण्यासाठी आत्मविश्वास असायला हवा. संभाजीनगर महानगरपालिकेत अडीच हजार कोटींचे शिवसेनेने विकास कामे केले आहे. राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. भ्रष्टाचाराचे हे मुद्दे आपण मांडले पाहिजे, असे आवाहन दानवे यांनी शिवसैनिकांना केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी म्हण्याचे संकटात संधी शोधायला हवी. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात गद्दारी झाली. गद्दारांचा सामना करण्यासाठी शिवसैनिक यांच्याकडे आशेने बघत आहे. शिवसैनिकानी गद्दारीचा बदला घेतला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बदला घेऊन गद्दारांना गाडायचे असल्याचे देसाई म्हणाले..
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर बाळासाहेबांचे या विषयावर आपली भावना व्यक्त केली.
आगामी काही काळातच गद्दार लोकांचे वाटोळे होणार आहे.. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मनपा निवडणूक गंभीर पूर्वक घेतली आहे..शिवसेना प्रमुख यांनी गद्दार गटाला मोठे केले तरीही ते पळून गेले... विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी जबरदस्त काम केले असून महाराष्ट्राचे रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते, अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंभ यांनी आभार प्रदर्शन केले तर राष्ट्रगीताने शिबिराचे समारोप करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना तथा खासदार नेते अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, लक्ष्मणराव वडले, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहप्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगप्रमुख राजू वैद्य, जिल्हा समन्वयक सुदाम सोनवणे, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, बाळासाहेब थोरात, तालुकाप्रमुख सचिन वाणी, संजय मोटे, आनंद भालेकर, मनोज पेरे, विष्णु जाधव, सुभाष कानडे, शंकर ठोंबरे, दिलीप मचे, रघुनाथ घारमोडे, सोमीनाथ करपे, किसानसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, राखी परदेशी, लता पगारे, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, देवयानी डोणगावकर, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, तालुका संघटक रूपाली मोहिते, स्वाती माने व युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे हे उपस्थित होते.
What's Your Reaction?






