वैद्यकीय देशव्यापी बंदला प्रतिसाद, क्रांतीचौकात निदर्शने, रस्ता केला जाम
वैद्यकीय देशव्यापी बंदला प्रतिसाद, क्रांतीचौकात निदर्शने, रस्ता केला जाम
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.17(डि-24 न्यूज) कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रांतीचौकात डॉक्टरांनी दिड तास तीव्र निदर्शने करत रस्ता जाम केला.
आयएमएच्या बंदला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला. आरोपिंना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलक डॉक्टरांनी केली.
आज या बंदमध्ये शहरातील सर्व डॉक्टर्स, मार्ड, निमा, होमिओपॅथी असोसिएशन, एम आर असोसिएशन, दंतरोग असोसिएशन, पॅरामेडिकल अशा सर्वच वैद्यकीय सेवेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
निदर्शने आयएमएच्या अध्यक्षा डॉ.उज्वला दहिफळे व सचिव डॉ.विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
9 ऑगस्ट रोजी पहाटे कोलकाता येथील आर जी कार मेडीकल काॅलेजमध्ये पदव्युत्तर तरुणीवर अत्याचार करुन तिची अमानूषपणे हत्या करण्यात आल्याने देश हादरला. यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला. यामुळे डाॅक्टर्सच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेच्या अतिमहत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वीपासून प्रलंबित सुरक्षेसंदर्भातील न्याय मागण्यासाठी निवासी डॉक्टर्स देशव्यापी संपावर गेले आहेत. आयएमएने देशभरात निदर्शने आणि कँडल मार्च काढण्यात आले. अशा घटनांमुळे रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिका-यांचे काम आहे. मात्र डॉक्टर्सच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात. कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज शनिवारी सकाळी 6 वाजेपासून निषेध पाळून ते रविवारी 6 वाजेपर्यंत 24 तासांसाठी वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांनी देशव्यापी सेवा बंद ठेवण्यात आली. या आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती डि-24 न्यूजला आयएमएच्या अध्यक्षा डॉ.उज्वला दहिफळे यांनी दिली
आहे.
What's Your Reaction?