मोकाट जनावरे रस्त्यावर सोडू नका, कोंडवाड्याचे दर वाढले...!
मोकाट जनावरे रस्त्यावर सोडू नका, कोंडवाड्याचे दर वाढले...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.17(डि-24 न्यूज) रस्त्यावर मोकाट जनावरे सोडने आता महागात पडणार आहे. कोंडवाड्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने स्थायी समीतीत ठराव घेतला आहे.
महापालिकेच्या हद्दीत मोकाट जनावरांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावर बसून रहदारीस अडथळा निर्माण करतात. मोकाट जनावरांमुळे बरेच वेळेस अपघात सुध्दा घडले आहे. ती जनावरे दुभाजकांमध्ये शहराचे सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेली आहे ती झाडे खाऊन नष्ट करतात.
त्यामुळे कोंडवाडा शुल्क वसूली दरामध्ये वाढ करण्यात येत आहे. एकदा कोंडवाड्यात दाखल करुन सोडण्यात आलेले जनावरे दुसऱ्या वेळेस जनावरे कोंडवाड्यात आल्यास ते जनावरे जप्त करुन गोशाळेत पाठवण्यास येणार आहे.
कोंडवाड्यात म्हैस, रेडा, वगार, उंट पहील्या दिवशी दोन हजार रुपये, त्यानंतर प्रती दिवस एक हजार रुपये लागतील. गाय, बैल पहील्या दिवशी 1000 रुपये, त्यानंतर प्रती दिवस 500 रुपये, गो-हा, कालवड, घोडा पहिल्या दिवशी 800 रुपये, त्यानंतर प्रती दिवस 400 रुपये, बकरी, बोकूड, पिल्लू पहिल्या दिवशी 400 रुपये, त्यानंतर प्रती दिवस 200 रुपये दरवाढ केली आहे.
अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.
What's Your Reaction?