मोतीकारंजा अंगुरीबाग येथील धोकादायक इमारत पाडली

 0
मोतीकारंजा अंगुरीबाग येथील धोकादायक इमारत पाडली

मोतिकारंजा अंगुरी बाग येथील धोकादायक इमारत जमिनदोस्त...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)

शहरातील मोतीकारंजा अंगूरी बाग येथील दोन मजली धोकादायक इमारत निष्काशीत करण्यात आली.

महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत शहरातील धोकादायक इमारती काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल रंगार गल्ली येथील धोकादायक इमारत जमिनदोस्त करण्यात आली होती. शहरातील नोटीस दिलेल्या धोकादायक इमारती वरती कारवाई करणे बाबतचे आदेश आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहे.

 या अनुषंगाने आज अंगूरी बाग मोती कारंजा येथील 28 बाय 50 या आकाराची दोन मजली इमारत अंदाजे 40 ते 50 वर्षांपूर्वीचे बांधकाम मालक राजेश गुगळे हे असून सध्या या इमारतीचा वापर कोणीच करत नव्हते. तसेच या धोकादायक इमारतीचा अर्धा भाग डीपी प्लान रस्ता बाधित आहे. या धोकादायक इमारती मुळे परिसरातील लहान मुले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. तसेच बाजूला शाळा व धार्मिक स्थळ असल्यामुळे नेहमीच या भागात वर्दळ असते. यामुळे आयुक्त यांनी आठ दिवसापूर्वी या भागाची पाहणी केली होती व संबंधित सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांना याबाबत महानगरपालिका नियमानुसार कारवाई करण्याचे सूचना दिल्या होत्या.

 त्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे सर्व नोटीस वगैरे देऊन त्याची मुदत संपली होती. याचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे 

ही धोकादायक इमारत आज अतिक्रमण हटवा पथका मार्फत जमीनदोसात करण्यात आली. तसेच सिटी चौक रंगार गल्ली फुलबाजार येथील रस्ता बाधित अनधिकृत तीन लहान दुकाने, बांधकामे निष्काशीत करण्यात आली. यामुळे रंगार गल्ली येथील रस्ता आता पुढे गायत्री चार्ट भंडार पर्यंत पूर्ण मोकळा झाला आहे.

यानंतर मोती कारंजा येथील महानगरपालिकेच्या शाळा लगत असलेल्या आठ लोखंडी टपऱ्या व इतर किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमणे शेडसह काढण्यात आले. सदर कारवाई मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, महेश खडसे, मजहर अली, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव नागरी मित्र पथक कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow