नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती...

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती;
दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)-नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट – ड संवर्गात पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा दि.1 ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. प्रवेशाचे ऑनलाईन प्रवेशपत्र ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे, असे नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत करण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड शिपाई 284 पदे भरती करीता दि.22 एप्रिल रोजी वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्या करीता, तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरीता आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे. त्यानुसार आय.बी.पी.एस कडून दि.22 एप्रिल ते 16 मे दरम्यान ऑन लाईन पद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. आय.बी.पी.एस च्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.1 ते 8 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व हॉल तिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस कडून पाठविण्यात येणार आहे. परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणुक करण्यात आलेली नाही. याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध रहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






