रिक्षाचालक आले अडचणीत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली जोरदार निदर्शने...!
विविध मागणीसाठी रिक्षाचालक मालक संघटनांनी केले आंदोलन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज) रिक्षाचालक मालक यांच्या विविध मागणीसाठी रिक्षा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
रिक्षाचालकांची मुख्य मागणी आहे ऑनलाईन पावती बंद करावी, नवीन परमिट देने बंद करावे, ई-रिक्षा वाहतूक शहरात बंद करावी, रिक्षा स्टँड वाढवावे, रिक्षाचालकांच्या मंडळाला निधी उपलब्ध करून द्यावे, सिटी बस शहराच्या बाहेर चालवू नये.
केंद्र सरकारच्या वतीने वाहतूक दंडासाठी अगोदर शंभर दोनशे रुपयांची पावती दिली जात होती आता कमीत कमी 1500 रुपयांची ऑनलाईन चालान दिले जात आहे. शहरात पुरेसे रिक्षा स्टँड नाही. वाहतूक पोलीस त्यांच्या खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून ऑनलाईन पावत्या पाठवतात. रिक्षात प्रवासी बसताना, उतरताना एवढेच नाही तर चालत्या गाडीचा देखील फोटो काढून दंडाची पावती ऑनलाईन पाठवतात. अनेक ठिकाणी सिग्नल बंद आहेत अशा ठिकाणी स्टाॅप लाईनवर कशी थांबवावी...? परंतु अशा सिग्नलवर देखील स्टाॅप लाईनपूर्वी रिक्षा थांबवली नाही म्हणून दंडाची पावती ऑनलाईन पाठवली जाते. रिक्षावाला पोलिसांचा टार्गेट बनला आहे. अधिकारी स्वतः कोणत्याही कायद्याचे पालन करत नाही आणि गरीब रिक्षावाल्यांनी जराशी चुक केली किंवा नाही तरीही मोठमोठ्या रकमेचे ऑनलाईन दंड लावून त्यांच्या कमाईवर डल्ला मारत आहे.
शहरात 35 हजार ऑटोरिक्षा आहेत. दिवसेंदिवस कमाई कमी होत आहे. महागाई वाढत आहे. दरदिवशी मोठ्या अडचणीत 200 ते 300 कमाई होते. यामुळे ऑनलाईन दंडाची रक्कम भरता येत नाही तशीच शिल्लक राहून वाढत जाते. यामुळे या दंडाची रक्कम 50 हजार ते एक लाखापुढे गेली आहे. लोक अदालत मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची सुट दिली जात नाही. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नवीन परमिट दिले जात आहे. इलेक्ट्रॉनिक रिक्षांना 15 वर्षांची परवानगी दिली जाते. पेट्रोल, डिझेल रिक्षावाल्यांना दरवर्षी आरटिओ पासिंग करावी लागते. या भेदभावामुळे रिक्षावाला अधिक अडचणीत आलेला आहे. सिटी बसची संख्या दुप्पट केली जात आहे त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी निसार अहमद खान, अॅड अभय टाकसाळ, अज्जू लिडर, प्रकाश हेगडे, बिसन लोधे, गजानन वानखेडे, अब्दुल रशीद खान, वसिम खान, मोहम्मद बशिर, इलियास किरमानी, फैसल खान, हफीज अली, जाकेर पठाण, महंमद फारुख, नईम पठाण, अफरोज बेग, मनोज जैस्वाल आदी उपस्थित
होते.
What's Your Reaction?