लाखो मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, सम्यक विद्यार्थी आंदोलन एल्गार पुकारणार...!

 0
लाखो मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, सम्यक विद्यार्थी आंदोलन एल्गार पुकारणार...!

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नियमित मिळत नसल्याने सम्यक विद्यार्थी संघटना एल्गार पुकारणार...

पत्रकार परिषदेत प्रशांत बोरडे यांची माहिती...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज)

आंबेडकरी समुहातील दलित विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे. उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळत नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत असलेली शिष्यवृत्ती नियमित देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभर एल्गार पुकारण्यात येणार आहे. अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 बोरडे पुढे म्हणाले, आंबेडकरी सुमहातील विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे. महाडीबीटी कडून शिष्यवृत्ती दिली जात होती. ती गेल्या दोन तीन वर्षापासून दिली जात नाही. लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत त्यामुळे उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना मोठया आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाई निर्देशांकानुसार स्वाधार योजनेत शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र आता शासनाने स्वाधारमध्ये जाचक अटी शर्ती लागू केल्या आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीला मुकावे लागत आहे. बार्टीकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. यासाठी पुण्याच्या बार्टी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. या सरकारकडून जातीयवाद सुरू आहे असा आरोप त्यांनी लावला. गेल्या साडेतीन वर्षात तीन कोटी रूपये परत गेले आहे. बोरडे पुढे म्हणाले, सरकार पुरोगामी असेल तर प्रशासन सुध्दा पुरोगामी सारखे वागते. सरकार जसे असेल तसे प्रशासन सुध्दा वागत आहे. गरीबांना मिळणारे मोफत शिक्षण बंद करून त्याचे खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाची दारेच बंद करण्याचा डाव आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दिड लाख विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली गेली नाही. शिक्षणाचा मुलभूत अधिकार पूर्वी प्रमाणे मिळावा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही आंदोलनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच बेरोजगार भत्ता सुरू करण्यात यासह इतर मागण्यासाठी लवकरच एल्गार पुकारण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरूंधती शिरसाठ, योगेश बन यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow