जनाजा मोर्चा काढणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...!

जनाजा मोर्चा काढणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.1 (डि-24 न्यूज) -
आज दुपारी नारेगाव येथील मुस्लिम समाजाने कब्रस्तानाला शासनाने जागा द्यावी या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने जनाजा मोर्चा काढला. या मोर्चाला एसडिपिआय पक्षाने पाठींबा देत पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हा प्रशासनाने नारेगाव मुस्लिम कब्रस्तानसाठी गट क्रं.26 सेहजेतपूर येथे साडेसात एकर जमीन मंजूर केली आहे. या जमीनीवर अतिक्रमण असल्याने आतापर्यंत हि जागा हस्तांतरीत केली नाही. मागील पाच वर्षांपासून कब्रस्तानच्या जागेसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. आज निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरीक उपस्तथित होते. गरवारे स्टेडियमजवळ पोलिसांना मोर्चेक-यांना ताब्यात घेतले. सातारा पोलिस स्टेशन येथे नेल्यानंतर कार्यवाही करुन सुटका केली. 15 दिवसांत सातबा-यावर मुस्लिम कब्रस्तान उल्लेख केला नाही तर राज्यात जनाजा मोर्चा काढण्याचा इशारा शहर कार्याध्यक्ष अलियार खान यांनी दिला आहे.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे मौलाना नईम कासमी, एसडिपिआयचे मोहसीन खान, दिपक शिंदे, मौलाना अब्दुल सत्तार, सलिम पटेल, विलास साळवे, डाॅ.राहुल सोनाला व आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






