डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चिकलठाणा चौकात स्थलांतर करण्यासाठी आंदोलन...

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चिकलठाणा चौकात स्थलांतर करण्यासाठी आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) -
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा चिकलठाणा चौकात स्थलांतरीत करावे या मागणीसाठी आज महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी नागरीक उपस्थित होते.
डाॅ.बाबासाहेब रामजी आंबेडकर प्रतिष्ठाण समीतीतर्फे महापालिकेला निवेदन दिले होते. त्यांनी चर्चा केली आम्ही स्थळपाहणी करुन तुम्हाला सांगून व विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असे तोंडी सांगण्यात आले. तसेच 22 जुलै रोजी आयुक्त जी.श्रीकांत हे चिकलठाणा येथे त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला गावातील सर्व समाजबांधव हजर होते. असे कळते परंतु सदरील बैठकीत बौध्द समाजातील एकही व्यक्तीला निमंत्रित करण्यात आले नाही. सदरील बैठकीमध्ये आयुक्तांनी सांगितले की गावातील सर्व महापुरुषांचे पुतळे जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथे हलविण्यात येतील. म्हणून चिकलठाणा परिसरातील आंबेडकरी जनतेला विचारात न घेता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा या जागेवरुन हलवण्यास आमचा तीव्र विरोध आहे. निर्णयाविरोधात आमची मागणी मान्य न झाल्यास कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनावर रवी मगरे, भाऊराव बनकर, चंदन साळवे, विशाल इंगळे, रामभाऊ बनकर, मिलिंद बनकर, बाळू साबळे, नागपाल गंगावणे, संदीप मगरे, संतोष पगारे, संतोष मगरे, राजू मगरे, अशोक मगरे, दिलीप बोकडे, मिलिंद मोकळे, रवी प्रधान, राहुल मगरे, सुमीत जगधने, रवी वाघमारे, धम्मदीप नरवडे, राजु साळवे, संजय ससाणे, अक्षय बनकर, भिमराव मगरे, भारत भाऊ घोरपडे यांची सही आहे.
What's Your Reaction?






