सिल्लोड तालूक्यात ढगफुटी जन्य परिस्थिती, पुरामध्ये अडकलेल्या 5 जणांना बचावकार्य पथकाने बाहेर काढले...

 0
सिल्लोड तालूक्यात ढगफुटी जन्य परिस्थिती, पुरामध्ये अडकलेल्या 5 जणांना बचावकार्य पथकाने बाहेर काढले...

सिल्लोड तालूक्यात ढगफुटी जन्य परिस्थिती, पुरामध्ये अडकलेल्या 5 जणांना बचावकार्य पथकाने बाहेर काढले...

नद्यांना पुर, तलाव तुडुंब, गावात पाणीच पाणी, पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू...पंचनामे करण्याचे आमदार अब्दुल सत्तार यांचे आदेश, महसूल, फायर ब्रिगेड बचाव कार्यात...

अद्रक, मका, ज्वारी, कापूस, फळबाग, पालेभाज्या पिकांचे प्रचंड नुकसान...

 

 सिल्लोड, दि.15(डि-24 न्यूज) - आज सकाळी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळ व परिसरात रात्री 3 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत ढगपुटी सदृश्य पाऊस झाला. सध्याही पाऊस सुरू झाल्याने लोक हवालदिल झाले आहेत. अचानक झालेल्या या अतिवृष्टीने या गावातील जनजीवन विस्कळीत होऊन काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. तहसीलदार , सिंचन व इतर विविध शासकीय अधिकाऱ्यांना या गावात थांबून आवश्यक व तातडीच्या उपयोजना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, फायर ब्रिगेड बचावकार्यात आहे. त्यांनी गावात जावून परिस्थिती पूर्व पदावर येण्यासाठी कार्यवाही करून आढावा घेतला. तसेच शासकीय यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. आमठाणा मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचा सूचना तहसीलदार यांना दिल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी, नागरिकांनी भयभीत न होता धीर धरावा, ता संकटकाळी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मेघ गर्जना व विजांचा कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. जेव्हा आकाशात विजा चमकत असतील आणि ढगांचा गडगडाट होत असेल, तेव्हा शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास, शेतात काम करणे टाळा, उंच झाडा खाली उभे राहू नका आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, जनावरांची काळजी घ्या असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले.

आमठाणा, घाटनांद्रा, चारनेर, धारला, देऊळगाव बाजार, चारनेरवाडी, पेंडगाव, केळगांव व परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येणारे 24 तास छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तहसीलदार सिल्लोड यांनी दिलेल्या माहितीनुसार चारणा या स्थानिक नदीस आज सकाळी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने चारणा नदीला पूर आला होता मौजे देऊळगाव बाजार येथे 5 जण पुरांमध्ये अडकले होते. बचाव पथकाने त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. बचावकार्यासाठी फायर ब्रिगेड, मनपा छत्रपती संभाजीनगर यांचे पथक दाखल झाले. औरंगाबाद छावणी, व एक आर्मीचे पथक मागवले आहेत. 

जायकवाडीच्या नाथसागर विसर्गात वाढ...

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प नाथसागराच्या विसर्गात आज वाढ करण्यात आली. आज पहाटे 12.30 ते 1 वाजेपर्यंत धरणाचे द्वार क्रं.10 ते 27 असे एकूण 18 दरवाजे 0.5 उचलून 1.0 फूट पर्यंत उघडले. गोदावरी पात्रात 9432 क्यसेक इतका विसर्ग वाढला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी पात्रात एकूण 18 गेटमधून 9432 + 9432=18864 क्युसेक सुरू राहील. आवक लक्षात घेऊन विसर्गात वाढ अथवा घट करण्यात येईल. नदीकाठच्या जनतेने सतर्क राहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेली माहिती...

पर्जन्यमान तपशील...

वार्षिक सरासरी पर्जन्यमान मी.मी., जून ते सप्टेंबर

581.7 मी.मी.

आजचे पर्जन्यमान 5.5 मी.मी.

1 जून 2025 ते आजपर्यंतचे पर्जन्यमान 549.7 मी.मी.(94.5 टक्के)

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, धारला, चारनेर, चारनेरवाडी, पेंडगांव, देऊळगाव बाजार, आमठाणा, धावडा, चिंचवण गावांचा संपर्क तात्पुरता तुटला होता. सद्यस्थिती पाणी ओसरले असल्याने परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. देऊळगाव बाजार येथील चारणा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 5 जणांना शोध व बचाव पथकामार्फत नागरीकांना सुरक्षित रितीने सुटका करण्यात आली. जायकवाडी धरणाची टक्केवारी 99.01, एकूण विसर्ग 28.296 क्युसेक. आज रोजी संभाजीनगर जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट IMD मार्फत देण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow