पत्रकारांच्या हितासाठी सरकारपुढे झुकणार नाही - एस.एम.देशमुख
पत्रकारांच्या हितासाठी सरकारपुढे झुकणार नाही :
एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादन
राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी पत्रकारांच्या मागण्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. अधिवेशनात मांडलेले ठराव बैठक घेऊन संघटनेसोबत चर्चा करून सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज) - पत्रकारांच्या हितासाठी मी सरकारपुढे कदापी झुकणार नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख यांनी केले.
परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पत्रकारांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकार आमच्या संघटनेचा कणा आहे. या पत्रकारांच्या पदरात शासनाच्या योजना पाडून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पण सरकार यात अनंत अडथळे निर्माण करत आहे. पेन्शन योजना, पत्रकारांच्या स्वतंत्र कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य विषयक प्रश्नांना बगल देण्याचे काम सरकार करत आहे. एवढेच नाही तर राज्यात संघटने मधून जाणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या कमी करण्याचा घाटही रचला जात आहे. असे झाले तर यापुढे संघटनेतून एकही प्रतिनिधी समितीत जाणार नाही, असे धाडसी विधान त्यांनी केले.
प्रारंभी पंडित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलित करून उद्घाटन झाले.
या वेळी संपादक माध्यम तज्ञ तुळशीराम भोईटे, अभिव्यक्ती न्यूज चॅनलचे रवींद्र पोखरकर, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषदेचे प्रांत अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, गणेश मोकाशी, गो. पी. लांडगे, सचिन शिवशेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल, स. सो. खंडाळकर, नागेश गजभिये, अब्दुल कदीर यांचा एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील टीमचे जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, सुनील वाघमारे, कानीफ अन्नपूर्णे, महादेव जामनिक, ब्रह्मानंद चक्करवार, सल्लागार, धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे यांचे एस. एम. यांनी तोंडभरून कौतुक केले. प्रारंभी बालाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मानंद चक्करवार यांनी केले, आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले. अधिवेशनाला राज्यभरातून शेकडो पत्रकार आले होते. याप्रसंगी डिजिटल मीडीयाच्या माध्यमातुन पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डि-24 न्यूज मराठी वेबपोर्टल मागिल पाच वर्षांपासून ताज्या घडामोडी प्रसारीत करुन वाचकांच्या मनात आपल्या लेखनातून अधिराज्य गाजवणारे पत्रकार आरेफ देशमुख यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
What's Your Reaction?