अधिस्वीकृती समीतीच्या बैठकीत लाखोंची उधळपट्टी, पत्रकारांचे प्रश्न सुटणार का...?

अधिस्वीकृती समीतीच्या बैठकीत लोखोंची उधळपट्टी, पत्रकारांचे प्रश्न सुटणार का...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती शासकीय समीतीची शहरात दोन दिवसीय बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. आज 13 सप्टेंबर व उद्या 14 सप्टेंबर रोजी हि बैठक चिकलठाणा विमानतळासमोरील प्रतिष्ठित हाॅटेल हयात येथे सुरू आहे. या बैठकीत लाखोंची उधळपट्टी करण्यात येत आहे. शहरात भव्य दिव्य पत्रकार भवन आहे. सुभेदारी विश्रामगृह आहे मग शासकीय बैठक येथे का घेतली नाही. असा प्रश्न विचारला जात आहे. शहरात पत्रकारांचा कार्यक्रम आहे असे सांगून जवळपास लाखो रुपयांची वसूली काही लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांकडून केल्याची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे. हि बैठक राज्य शासनाच्या वतीने माहिती महासंचालक कार्यालयातर्फे आयोजित केली जाते मग पत्रकारांचा कार्यक्रम आहे असे खोटे सांगून शासकीय बैठकीसाठी हा उपद्व्याप कशासाठी. जर शासनाने बैठक आयोजित केली तर स्टार बड्या हाॅटेलमध्ये बैठक आयोजित करण्याचा उद्देश काय...? शासन खर्च करत असेल तर हे उकळलेले पैसे कोणाच्या खिशात किंवा घशात गेले. बैठकीत आलेल्या राज्य स्तरीय समिती सदस्यांना मोठे गिफ्ट पण दिले जातात या सर्व गोष्टींची योग्य माहिती घेऊन चौकशी करून लाखोंची कमाई करणा-या त्या पत्रकारावर कार्यवाई अपेक्षित आहे अशी खमंग चर्चा पत्रकारांच्या गोटात जोरात सुरू आहे. एकीकडे अधिस्वीकृती कार्ड साठी पत्रकारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यांचे प्रश्न या बैठकीत मार्गी लागतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासकीय समीती आहे तर बैठकीचा खर्च तर शासकीय तिजोरीतून होणार मग बैठकीच्या नावावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी हा प्रश्न विचारला जात आहे.
What's Your Reaction?






