विभाग, जिल्हा तालुका नामांतरावरावर सुनावणी पूर्ण, उद्या शहराच्या नामांतरावरावर सुनावणी

 0
विभाग, जिल्हा तालुका नामांतरावरावर सुनावणी पूर्ण, उद्या शहराच्या नामांतरावरावर सुनावणी

विभाग, जिल्हा तालुका नामांतरावरावर सुनावणी पूर्ण, उद्या शहराच्या नामांतरावरावर सुनावणी

मुंबई उच्च न्यायालय देणार नामांतरावरावर निर्णय, न्या.चपळगांवकर यांनी दिलेल्या निर्णयाची घेतली दखल.‌‌..

मुंबई, दि.4(डि-24 न्यूज) आज मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद विभाग, जिल्हा तालुका व गावाच्या नामांतरावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्यक्ष, न्या.आरेफ डॉक्टर यांच्या कोर्टासमोर पाच तास सुनावणी झाली. राज्य सरकारने या नामांतरावरावर 15 सप्टेंबर रोजी गॅझेट काढत नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. मोहंमद हिशाम उस्मानी यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. जेष्ठ विविज्ञ एस.एस.काझी यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितले हे मुगल सम्राट औरंगजेब यांच्या काळातील ऐतिहासिक नाव आहे. नवीन महसूली क्षेत्र नाही शेकडो वर्षांपासून हेच नाव आहे म्हणून हे नाव केंद्राच्या गाईडलाईननुसार बदलता येत नाही. लाखो आक्षेप विभागीय आयुक्त कार्यालयात जमा झाले प्रशासनाने त्या आक्षेपांवर सुनावणी न घेता विभाग जिल्हा तालुका व गावाचे नाव बदलले. न्यायालयाने 16 सप्टेंबर चा गॅझेटवर स्टे करावे अथवा आमची याचिका रद्द करावी जेणेकरून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी रस्ता मोकळा होईल. असा युक्तिवाद काझी यांनी केला. सरकारी अधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडली. अॅड सतिश तळेकर यांनी उस्मानाबाद जिल्हा तालुका व गावाच्या नावावरून युक्तिवाद केला.

1995 मध्ये जेव्हा औरंगाबाद नामांतरावरावर निर्णय घेण्यात आला होता तेव्हा न्या.चपळगांवकर यांनी आपल्या निर्णयात सांगितले होते सरकारला नाव बदलण्याचा अधिकार आहे या निर्णयावर सुध्दा आजच्या सुनावणीत युक्तिवाद करण्यात आला. अॅड मोइन शेख यांनी अॅड काझी यांना (assist) सहकार्य केले.

उद्या औरंगाबाद शहर व उस्मानाबाद शहर नामांतरावरावर सुनावणी होणार आहे. अशी माहिती याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.

औरंगाबाद विभाग, जिल्हा तालुका गावाच्या नावावर सुनावणी पूर्ण झाली आता लवकरच निर्णयाची अपेक्षा आहे. देश व राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow