आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही - माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही - माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 31 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 18 रुग्णांचा दोन दिवसांत मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे. विरोधीपक्ष या घटनेनंतर सरकारवर तुटून पडले आहे. आज दुपारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घाटी रुग्णालयात भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना राज्य सरकारकडे या यंत्रणेकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी टीका त्यांनी केली.
त्यांनी सांगितले तात्काळ अमुलाग्र बदल करून आरोग्य यंत्रणेला सरकारने मजबूत करण्यासाठी निर्णय घ्यावे. शासकीय रुग्णालयात मनुष्यबळ कमी आहे रिक्त जागा त्वरित भरावे. आरोग्यमंत्री असताना आरोग्य भरती काही प्रमाणात केली होती. या सरकारने भरतीकडे अजून लक्ष दिले नाही. पायाभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात 2200 पदभरतीपैकी फक्त 895 जागाच भरलेली आहे यामुळे रुग्णसेवेवर ताण वाढलेला आहे. बांधकाम विभाग दुरुस्ती व विविध इमारती व अन्य कामांकडे लक्ष देत नाही. स्वच्छता कर्मचारी अर्धवट असल्याने अस्वच्छता वाढत आहे. यामुळे रुग्णांना इन्फेक्शनचा धोका आहे. औषध पुरवठा अशा विविध कारणांमुळे रुग्णांना उपचारादरम्यान असुविधा होत आहे. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
वर्ग-1 सिनिअर डॉक्टर 12, वर्ग-2 असो. प्रोफेसर 20, 54 असि. प्रोफेसर, परिचारिका 234, चतुर्थश्रेणी कर्मचारी 216 या पदांची जागा रिक्त आहेत. औषधी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील 2020-21 चे अजूनपर्यंत औषधी पुरवठ्याचे बील मिळालेले नाही अशी परिस्थिती असली तर कशी आरोग्य यंत्रणा सुधारणार असा प्रश्न पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात परिस्थिती किती वाईट होती ती परिस्थिती हाताळण्याचे काम केले असे ते पुढे म्हणाले.
What's Your Reaction?