शाहनूर हमवी दर्गा कमिटीत बदल, मेडीकल काॅलेज उघडणार...

शाहनूर हमवी दर्गा कमिटीत बदल, मेडीकल काॅलेज उघडणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) -
हजरत सय्यद शाहनूर हमवी रह दर्गाह कमिटीत मोठा बदल करण्यात आला आहे. दर्गाहच्या परिसराच्या विकासावर उस्मानपुरा येथील नागरीक संतुष्ट आहे. भविष्यात समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मेडीकल काॅलेज, शाळा, कम्प्युटर क्लास व परिसरातील महीलांसाठी शिवन क्लास उघडण्याचा माणस आहे. परिसरातील नागरीकांना विश्वासात घेवून नवीन कमिटी काम करणार आहे असे उद्गार सत्कार प्रसंगी कमीटीचे अध्यक्ष जावेद पटेल यांनी केले. नवनियुक्त सहसचिव अबरार कुरेशी यांनी उस्मानपुरा येथे नवीन दर्गाह कमिटीचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते. फेटे बांधून , ढोल ताशांच्या गजरात, मोठे हार घालून कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. दर्गा मध्ये कमिटीने शादीखाना व निवासी गेस्ट हाऊस बनवला. परिसर स्वच्छ केला आहे. देशभरातून लोक दर्गाहला भेट देण्यासाठी भाविक येतात त्यांच्यासाठी भौतिक सुविधा निर्माण केले. नवीन कमीटी आता कायम असणार आहे यामध्ये बदल होणार नाही, काम करणा-यांना या कमेटीत स्थान दिले आहे असे यावेळी जावेद पटेल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जुनेद अप्पास यांनी केले.
नवीन कमिटी...
अध्यक्ष जावेद पटेल, उपाध्यक्ष बाबा कुरेशी, सचिव रफीक खान, कोषाध्यक्ष रऊफ पटेल, सह सचिव अबरार कुरेशी, सल्लागार शौकत अली, सदस्य सलिम तारा साहेब कुरेशी, शेख सलिम, सय्यद शफ्फाद सलमान, शेख महेमुद, अखिल खान अहेमद, मोहंमद आरेफ यांना नवीन कमेटीत स्थान देण्यात आले आहे.
What's Your Reaction?






